कल्याण, 25 एप्रिल : लोकप्रतिनिधींनी ठरवलं तर कोणत्याही संकटावर मात करणं हे सोपं होऊ शकतं. कल्याणमध्ये याचा प्रत्यय आला आहे. कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्या आमदार निधीतून एक कोटी रुपये ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी देण्याचं जाहीर केलं आहे. एवढंच नव्हे तर मुलाच्या लग्नातला खर्च टाळून त्या पैशात मतदारसंघातील नागरिकांचं लसीकरण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
(वाचा-कोरोनाबाधित वडिलांना शेवटचं पाहण्यासाठी चेहऱ्यावरुन कपडा हटवला आणि मुलगा हादरलाच)
कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आर्थिक आणि इतर बाजुंनीही समाजाची मदत मिळणं गरजेचं आहे. एकिकडे रोज हजारो रुग्णांची भर पडत असताना त्यांच्या नातेवाईकांना मात्र उपचार, औषधी ऑक्सिजन यासाठी धावाधाव करावी लागत असल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी बेड कमी पडत असल्यामुळंदेखिल रुग्णांचे हाल होत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतही अशाच समस्येचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. याठिकाणी बेड अभावी नागरिकांचे हाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे कल्याणच्या पूर्व भागात असलेल्या विठ्ठलवाडी याठिकाणी एक 100 बेडचं हॉस्पिटल तयार झालं आहे. ते सुरुही होणार होतं. मात्र याठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था नसल्यामुळं अद्याप ते सुरू करण्यात आलेलं नाही. ऑक्सिजन अभावी सुविधा असून लोकांच्या कामी येत नसल्यानं आमदार गणपत गायकवाड यांनी याची दखल घेत याठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी आमदार निधीतून 1 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.
मधून #१_कोटी रुपयांचा निधी तातडीने वर्ग करण्याची मागणी #जिल्हाधिकारी_ठाणे मा.श्री. #राजेशजी_नार्वेकर साहेब यांना पत्राद्वारे केली आहे.@KDMCOfficial@ThaneCollector@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis @mipravindarekar @ChDadaPatil #oxigen_plant #COVID19 #coronavirus #CovidIndia#KDMC pic.twitter.com/gSBw9B8OOZ
— Ganpat Gaikwad (@ganpatgaikwad9) April 24, 2021
गणपत गायकवाड यांनी सरकारकडून मिळणारा पैसाच या कामासाठी वळवला आहे असं नाही. तर त्यांनी त्यांच्याकडूनही कोरोनाच्या संकटाला संपवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. गणपत गायकवाड यांच्या मुलाचा विवाह 4 मे रोजी होणार आहे. त्यासाठी कुटुंबानं जय्यत तयारीही सुरू केली होती. पण कोरोनाचं संकट वाढल्यानं आता हा विवाह अगदी साधेपणानं केला जाणार आहे. या विवाहासाठी जो खर्च होणार होता, त्यातून मतदारसंघातील नागरिकांचं लसीकरण करण्याचा खर्च करण्याचा निर्णय गायकवाड यांनी घेतला आहे.
(वाचा-महत्त्वाची बातमी! 18 वर्षांवरील व्यक्तींचं walk in vaccination नाही, नोंदणी Must)
गणपत गायकवाड यांनी निधी जाहीर केला असून आता यावर पुढील सर्व प्रकिया योग्यपणे पूर्ण झाल्या तर लवकरच हे हॉस्पिटल नागरिकांसाठी सुरू करता येणार आहे. त्यामुळं लोकप्रतिनिधींना असलेले अधिकार त्यांना मिळणारा निधी याचा योग्य वापर केला तर समाजाच्या भल्यासाठी ते बरंच काही करू शकतात हेच गणपत गायकवाड यांच्या निर्णयावरून पाहायला मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.