Home /News /news /

राज्यातील समीकरणं बदलण्यास सुरुवात, भाजपच्या आमदाराने दिले 'या' निवडणुकीत मनसेसोबत युतीचे संकेत

राज्यातील समीकरणं बदलण्यास सुरुवात, भाजपच्या आमदाराने दिले 'या' निवडणुकीत मनसेसोबत युतीचे संकेत

राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेनंतर अनेक भाजप नेत्यांनी युतीचे संकेत देण्याचा प्रयत्न केला आहे.

    प्रदीप भणगे, कल्याण, 26 जानेवारी : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राजकीय भूमिका बदलून हिंदुत्त्वाचा झेंडा हाती घेतल्यानंतर आता राज्यातील समीकरणंही बदलण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेनंतर अनेक भाजप नेत्यांनी युतीचे संकेत देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच आता कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनीही याबाबत भाष्य केलं आहे. 'येणाऱ्या पालिकेच्या निवडणूक भाजप-मनसे एकत्र येऊ शकतात. जाती-धर्माचे विषय घेऊन चालणारे पक्ष एकत्र येत असतील तर आम्ही देशाचा विचार घेऊन चालणारे एकत्र नक्कीच येऊ शकतो,' असे वक्तव्य कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पिसवली गावातील रस्त्याच्या उदघाटनावेळी केले. कल्याणमधील पिसवली गावाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वीस हजार लोकसंख्या असलेल्या गावाची लोकसंख्या आज 80 हजारांच्या घरात गेली. त्यामुळे गावात सध्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याने पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून  ग्रामस्थांना प्रवास करावा लागत होता. त्यामुळे स्थानिक नगरसेवक आणि माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी केडीएमसी कडून 50 लाखांच्या डिपीप्लॅन रस्त्याच्या कामाचे उदघाटन आज आमदार गणपत गायकवाड यांनी केले. VIDEO : शिवभोजनच्या उद्घाटनासाठी गेलेल्या अजित पवारांनी घेतली फिरकी, हसून-हसून सगळेच लोटपोट डोंबिवली आणि कल्याण पूर्वेत येण्या-जाण्यासाठी या रस्त्याचा फायदा होणार आहे, असे भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी सांगितले. तर येणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत युती होणार का असा प्रश्न आमदार गणपत गायकवाड यांना विचारले असता त्यांनी महाआघाडी टोला मारत सांगितले की, 'येणाऱ्या पालिकेच्या निवडणूक भाजप-मनसे एकत्र येऊ शकतात. जातीधर्माचे विषय घेऊन चालणारे पक्ष एकत्र येत असतील तर आम्ही देशाचा विचार घेऊन चालणारे एकत्र नक्कीच येऊ शकतो.'
    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या