कल्याण-डोंबिवली पालिकेची इमारतच अनधिकृत !

कल्याण-डोंबिवली पालिकेची इमारतच अनधिकृत !

महापालिका क्षेत्रातील अनधिकृत इमारतींबाबत शासनाने नेमलेल्या अग्यार समितीचा अहवाल माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी पत्रकारांसमोर उघड केला

  • Share this:

डोंबिवली, 29 जून :  अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची जबाबदारी पालिकेची असते. पण त्याच पालिकेचं मुख्यालय अनधिकृत असेल तर काय म्हणाल, हो हे घडलंय कल्याण डोंबिवली पालिकेत. इथं पालिकेचं प्रशासकीय भवन, पालिका भवन, अत्रे रंगमंदिर या इमारती अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती उघड झालीय.

आधीच भ्रष्टाचारामुळे लक्तरे वेशीवर टांगल्या गेलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. कल्याण डोंबिवलीचा गाडा हाकणाऱ्या महापालिकेच्या प्रशासकीय आणि पदाधिकाऱ्यांच्या इमारती अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

महापालिका क्षेत्रातील अनधिकृत इमारतींबाबत शासनाने नेमलेल्या अग्यार समितीचा अहवाल माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी पत्रकारांसमोर उघड केला. महापालिकेची प्रशासकीय भवन, महानगरपालिका भवन, अत्रे रंगमंदिर पूर्ण इमारत ही बांधकामे अनधिकृत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष आयोगाने अहवालात नोंदवला आहे. या इमारती महापालिकेने स्वतः आरक्षित भूखंडावर कोणतीही परवानगी न घेता बांधल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यावरूनच कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न किती गंभीर बनलाय याची प्रचिती येते.

तब्बल अडीचशे पानांच्या या अहवालात प्रशासकीय यंत्रणेवर, अधिकाऱ्यांवर, वास्तू विशारदांवर दोषारोप ठेवून कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. तर या अहवालाच्या म्हणण्यानुसार रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या बांधकामांवर केलेली कारवाई अनधिकृत बांधकामांवरील कारवाई दाखवण्यात आल्याचे श्रीनिवास घाणेकर यांनी सांगितले.

तसंच हा सर्व अहवाल शासनाने स्विकारल्याची तोंडी माहिती शासकीय यंत्रणेकडून मिळाल्याचे स्पष्ट करीत या सर्व अधिकाऱ्यांवर कोणती आणि काय कारवाई करावी याचा निर्णय शासनाने घ्यावा असेही अहवालात नमूद केल्याचे घाणेकर यांनी सांगितलं.

हेही वाचा

विमा कंपन्यांनी कमावले 10 हजार कोटी, शेतकरी मात्र कंगालच !

VIDEO : 'ते' दोघे आणि विमान कोसळतानाचा 'तो' थरारक क्षण

 VIDEO : पुण्यातील पीव्हीआर मल्टिप्लेक्समध्ये मनसेची कर्मचाऱ्याला मारहाण

 काश्मीरमध्ये 'सुपर 500' महिला कमांडो रोखणार दगडफेक !

First published: June 29, 2018, 10:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading