कल्याण डोंबिवलीतील बाजारपेठा उद्यापासून बंद, जीवनावश्यक वस्तूंची दुकानं राहतील सुरू

कल्याण डोंबिवलीतील बाजारपेठा उद्यापासून बंद, जीवनावश्यक वस्तूंची दुकानं राहतील सुरू

या आदेशाचे उल्लंघन केल्यास कलम 188 प्रमाणे कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

  • Share this:

कल्याण, 19 मार्च : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण डोंबिवलीतील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर सर्व दुकाने 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हा निर्णय घेतला असून त्याचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर कलम 188 नूसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

कोरोनाचा फैलाव अधिक वाढण्याची शक्यता गृहीत धरून हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार उद्या शुक्रवारी सकाळपासून कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या हद्दीतील जीवनावश्यक वस्तू, बेकरी, डेअरी, किराणा दुकाने, मेडीकल स्टोअर्स, रुग्णालय/क्लिनिक, भाजीपाला आदी दुकानं आणि आस्थापना वगळता इतर सर्व दुकानं, व्यावसायिक आस्थापना 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबत आदेश दिले आहे.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास कलम 188 प्रमाणे कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

राज्यात रुग्णांची संख्या 49 वर

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. रुग्णांची संख्या 49 वर पोहोचली आहे. तर देशात कोरोना रुग्णांची संख्या 166 झाली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार उपाययोजना करत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळा, एकाच ठिकाणी जास्त गर्दी करू नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

कोरोनाला रोखण्यााठी सरकारने केले मोठे बदल

1. राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज 50 टक्के कर्मचारी येतील या हिशोबाने सुरू ठेवण्यात येतील.

2. रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

3. मुंबईमध्ये बेस्टमधील उभे राहणारे प्रवाशी बंद करण्यात येतील. तसेच प्रवाशी अंतराने बसावेत यासाठी तशा सूचना प्रवाशांना देण्यात येतील. शहरांमध्ये बसेसची संख्या वाढविण्यासाठी पर्यायी बसेसची व्यवस्था करण्यात येईल.

4. दुकानांच्या वेळा ठरविणार

शहरातील दुकानांच्या वेळा अशा तऱ्हेने ठरविण्यात येतील की, सर्व दुकाने अंतरा-अंतराने सकाळी व दुपारी सुरू होतील. बाजारातील तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्ये देखील एक दिवसाआड किंवा वेळांमध्ये बदल करण्यात येईल.

5. साधनसामुग्रीची उपलब्धता

दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये या ठिकाणी सर्व प्रकारची साधनसामुग्री उपलब्ध राहील हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आवश्यक तेवढ्या अलगीकरण कक्ष व विलगीकरण कक्षांची सोय करण्यात आली आहे. आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेशन, मास्क तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा साधने, औषध सामुग्री देखील उपलब्ध आहेत.

First published: March 19, 2020, 5:27 PM IST
Tags:

ताज्या बातम्या