Kalank Trailer- मेरे गुस्से में लिए गये एक फैसले ने हम सबकी जिंदगी बरबाद कर दी

Kalank Trailer- मेरे गुस्से में लिए गये एक फैसले ने हम सबकी जिंदगी बरबाद कर दी

नाजायज मोहब्बत का अन्जाम अक्स तबाही होता है... यासारखे दमदार संवाद ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात.

  • Share this:

मुंबई, ०३ एप्रिल- करण जोहरचा मल्टी स्टारर कलंक सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरमधून हा एक पीरियड ड्रामा लव्ह स्टोरी असल्याचं स्पष्ट होतं. कलंक सिनेमात वरुण धवन, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका आहेत. अभिषेक वर्मन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून येत्या १७ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. करणचा सिनेमा म्हणजे भव्यता आलीच. पण कलंक हा सिनेमा त्या अर्थाने वेगळा आहे. भव्य सेट असला तरी यात एक सॉफ्ट लव्ह स्टोरीही सांगण्यात आली आहे.

अनेक वर्षांनी प्रेक्षकांना कलंक सिनेमाच्या माध्यमातून माधुरी आणि संजयची हिट जोडी पाहता येणार आहे. जवळपास २१ वर्षांनी दोघं एकत्र काम करत आहेत. सिनेमाचा सेट जेवढा भव्य आहे तेवढंच आकर्षक या सिनेमाचं संगीत आहे. या सिनेमातून पुन्हा एकदा वरुण धवन आणि आलिया भट्टची जोडी पाहायला मिळणार आहे. तर सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूरची फ्रेश जोडी पहिल्यांदा सिनेमातून समोर येणार आहे.

अनेक वर्षांनी करण मल्ट्रीस्टारर सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे कलंककडून प्रेक्षकांना अनेक अपेक्षा आहेत. काही दिवसांपूर्वी कलंकचा टीझर प्रदर्शित झाला होता. टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. टीझरनंतर सिनेमातलं घर मोरे परदेसिया, फर्स्ट क्लास आणि कलंक टायटल ट्रॅकही प्रदर्शित करण्यात आलं होतं.

इथे पाहा कलंकचा दमदार ट्रेलर-

First published: April 3, 2019, 5:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading