Kalank Teaser- जब किसी और की बरबादी जीत जैसी लगे तो हमसे बरबाद कोई नहीं...

Kalank Teaser- जब किसी और की बरबादी जीत जैसी लगे तो हमसे बरबाद कोई नहीं...

ही एका कुटुंबाची गोष्ट आहे. जातीय दंगली सुरू झाल्यानंतर या कुटुंबाशी निगडीत वास्तव समोर यायला लागतं.

  • Share this:

मुंबई, १२ मार्ज २०१९- वरुण धवन, आलिया भट्ट, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांचा बहुप्रतिक्षित कलंक सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. अभिषेक वर्मन यांच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेला हा सिनेमा अनेक कारणांमुळे खास आहे. या सिनेमात एकाच वेळी अनेक स्टार कलाकारांना पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. आलिया आणि वरुणशिवाय आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका यात आहेत. पण या सगळ्यांपेक्षा प्रेक्षकांना संजय दत्त आणि माधुरी दीक्षितला मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता आहे.

१७ एप्रिलला प्रदर्शित होणारा हा सिनेमा एक पीरिएड ड्रामा आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमातील कलाकारांचा लूक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला होता. ही एका कुटुंबाची गोष्ट आहे. जातीय दंगली सुरू झाल्यानंतर या कुटुंबाशी निगडीत वास्तव समोर यायला लागतं. सुमारे ८० कोटींमध्ये हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. करण जोहर आणि साजिद नाडियाडवाला यांच्या बॅनर अंतर्गत या सिनेमाची निर्मिती झाली आहे. सिनेमात वरुण धवनने एकाहून एक सरस स्टंट केले आहेत.

सिनेमाच्या चित्रीकरणावेळी वरुणला मोठी दुखापतही झाली होती. आदित्य रॉय कपूर आणि आलियाबद्दल बोलायचे झाले तर, दोघं पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत.

Tags:
First Published: Mar 12, 2019 03:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading