केजरीवालांची चोरी गेलेली 'व्हॅगनार' कार अखेर सापडली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चोरीला गेलेली निळ्या रंगाची व्हॅगनार कार अखेर सापडली. गाझियाबादच्या मोहननगर परिसरात ही कार दिल्ली पोलिसांना सापडलीय. 3 दिवसांपूर्वी दिल्लीतल्या सचिवालय परिसरातून ही बहुचर्चित कार चोरीला गेली होती.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Oct 14, 2017 03:29 PM IST

केजरीवालांची चोरी गेलेली 'व्हॅगनार' कार अखेर सापडली

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चोरीला गेलेली निळ्या रंगाची व्हॅगनार कार अखेर सापडली. गाझियाबादच्या मोहननगर परिसरात ही कार दिल्ली पोलिसांना सापडलीय. 3 दिवसांपूर्वी दिल्लीतल्या सचिवालय परिसरातून ही बहुचर्चित कार चोरीला गेली होती.

केजरीवालांची गाडी चोरीला गेल्यानंतर त्यांनी राज्यपालांना एक खरमरीत पत्र लिहित दिल्ली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या दिल्ली पोलिसांनी दिवसरात्र एक करून या गाडीचा शोध सुरू केला. तेव्हा कुठे गाझियाबादमध्ये बेवारस स्थितीत ही कार आढळून आली

दिल्ली निवडणुकांदरम्यान अरविंद केजरीवाल याच गाडीमधून निवडणूक प्रचारासाठी जात होते. शिवाय मुख्यमंत्री झाल्यानंतरही बराचकाळ ते याच गाडीचा वापर करत होते. अलिकडच्या काळात वंदना नावाची आपची कार्यकर्ती या गाडीचा वापर करत होती. केजरीवालांची ही बहुचर्चित कार चोरीला गेल्याने सोशल मीडियावरही या घटनेची बरीच चर्चा रंगली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2017 03:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...