मुंबई, 29 मे- काजोल देवगणसाठी हे दिवस कोणत्याही काळ्या दिवसांपेक्षा कमी नाही. काजोलच्या सासऱ्यांचं वीरू देवगण यांचं दोन दिवसांपूर्वी २७ मे रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाच्या एक दिवसानंतर काजोलला लिलावती रुग्णालयाच्या बाहेर पाहण्यात आलं. रिपोर्टनुसार काजोलची आई आणि अभिनेत्री तनुजा यांना लिलावती रुग्णालयात भरती करण्यात आलं. त्यांना भेटण्यासाठीच काजोल रुग्णालयात गेली होती. तनुजा यांना नेमके काय झाले आहे याचा खुलासा अजूनपर्यंत झालेला नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तनुजा यांना गेल्या महिन्यात प्रकृती अस्वस्थ्यामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. पण आता त्यांची प्रकृती स्थिर असून येत्या दोन ते तीन दिवसांत तनुजा यांना घरी पाठवण्यात येईल. २०१८ मध्ये तनुजा यांना श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.
Finally मलायका- अर्जुनने मान्य केलं त्यांचं नातं, नात्याबद्दल तो म्हणाला...
उ ला ला... वर्ल्ड कपमध्ये खेळणारा हा क्रिकेटपटू विद्या बालनसोबत करणार बॉलिवूडमध्ये एण्ट्री
अजय देवगण यांचे वडील वीरू देवगण यांचं २७ मे रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. सासऱ्यांच्या जाण्याचं दुःख काजोलला अफाट झालं. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन तिचं सांत्वन करतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत वीरू यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देवगण कुटुंबावर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगात त्यांचं सांत्वन करण्यासाठी अनेक बॉलिवूड मंडळी अजयच्या घरी पोहोचली होती.
तगड्या मानधनसाठी 'या' 5 स्टार्सनी नाकारले सिनेमे
तनुजा मुखर्जी या बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री आहेत. वो हाथी मेरे साथी, बहारें फिर भी आएंगी, एक बार मुस्कुरा दो, प्रेम रोग, पैसा या प्यार, हमारी बेटी यांसारख्या सिनेमात त्यांनी काम केलं आहे. मराठीत पितृऋण सिनेमात काम केलं. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुकही झालं होतं.
SPECIAL REPORT : दहावीपेक्षा बारावीचे मार्क भरपूर, पाहा आर्चीचं रिपोर्टकार्ड