अजब प्रकार! राजनाथ सिंहानी ज्याच्या प्रचारासाठी गेले त्यालाच ओळखलं नाही

अजब प्रकार! राजनाथ सिंहानी ज्याच्या प्रचारासाठी गेले त्यालाच ओळखलं नाही

राजनाथ सिंह यांनी आपल्याच उमेदवाराला ओळखलं नाही. भाजपचे उमदेवार बृज किशोर बिंद हे राजनाथसिंह यांच्यासह व्यासपीठावरच बसलेले होते मात्र, सिंह यांनी त्यांना ओळखलं नाही.

  • Share this:

पाटणा, 22 ऑक्टोबर: बिहार निवडणुकीची (Bihar Election) रणधुमाळी जोरात सुरू झाली असून प्रचारानेही वेग पकडला आहे. त्यातच बुधवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) हे कैमूर जिल्ह्यातील (Kaimur) चैनपूर येथे सध्याच्या सरकारमधील मंत्री आणि भाजपचे उमेदवार बृज किशोर बिंद यांच्या प्रचारासाठी सभा घेण्यासाठी आले होते. मात्र, सिंह यांनी बिंद यांना ओळखलंच नसल्याचा अजब प्रकार इथे घडला. आजुबाजूच्या लोकांनी त्यांची ओळख करून दिली. या प्रकारामुळे जनता हैराण झाली होती. चैनपूरमधील भगवानपूर याठिकाणी ही सभा आयोजित करण्यात आली होती.

दरम्यान राजनाथ सिंह यांनी केंद्र सरकारच्या विकासात्मक कामांचा दाखला देत स्थानिक भाजप उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन जनतेला केलं. याआधी केंद्राद्वारे पाठवण्यात आलेल्या शंभर रुपयांपैकी 16 रुपयेच जनतेपर्यंत पोहचत होते, मात्र आता गरिबांचे पैसे कुठेच वाटले जात नाहीत तर थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याचं यावेळी ते म्हणाले. मोदी सरकारने गरिबांसाठी जन-धन खात्याची योजना सुरू केली जेणेकरून त्यांच्या कल्याणासाठी पाठवण्यात येणारा पैसा हा थेट त्यांच्या खात्यात पोहचावा. PM शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्राकडून सहा हजार रूपये पाठवले जातात, ते कुठल्याही हस्तक्षेपाशिवाय शेतकऱ्यापर्यंत पोहोचत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. आम्ही जी आश्वासने दिली होती ती पूर्ण केल्याचे सिंह यांनी या प्रचार सभेत सांगितले.

‘ज्यादा बोले तो गोली मार दूंगा’ कार्यकर्त्याला रिव्हॉल्व्हर दाखवणाऱ्या BJP मंत्र्याचा VIDEO VIRAL

मात्र, या सभेदरम्यान एक वेगळाच किस्सा घडला जेव्हा राजनाथ सिंह यांनी आपल्याच उमेदवाराला ओळखलं नाही. भाजपचे उमदेवार बृज किशोर बिंद हे राजनाथसिंह यांच्यासह व्यासपीठावरच बसलेले होते मात्र, सिंह यांनी त्यांना ओळखलं नाही, काही वेळानंतर तिथे उपस्थित काही नेत्यांनी बिंद यांची सिंह यांना ओळख करून दिली.

मोठी बातमी! ऑक्सफोर्ड कोरोना लशीच्या चाचणीदरम्यान एका वॉलेंटियरचा मृत्यू

भाजपचे उमदेवार बिंद हे 2009 पासून सातत्याने या जागेवर विजय मिळवत आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांच्याविरोधात बहुजन समाज पक्षाचे मोहम्मद जमा खान यांना उमेदवारी दिली आहे. चैनपूर येथे विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबरला मतदान होणार आहे.

First published: October 22, 2020, 3:50 PM IST

ताज्या बातम्या