संजू सिनेमातल्या '300 मुलींसोबत सेक्स'चा डायलॉग तुम्हाला चालतो, शाहिद कपूरची सटकली

संजू सिनेमातल्या '300 मुलींसोबत सेक्स'चा डायलॉग तुम्हाला चालतो, शाहिद कपूरची सटकली

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शाहिदने अभिनेता संजय दत्तच्या बायोपिकचाही उल्लेख केला.

  • Share this:

मुंबई, 25 जुलै : अभिनेता शाहिद कपूरच्या Kabir Singh नं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली मात्र सिनेमाच्या सुरुवातीपासूनच त्यातील सीन आणि डायलॉगवरून टीका सुरू होती. सिनेमा रिलीज होऊन आता एक महिना उलटल्यावरही या टीका थांबायचं नाव घेत नाहीत. हा सिनमा स्त्रियांविरोधातील वृत्तीला प्रेरणा देणारा असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. पण आता सर्व स्तरातून होत असलेल्या या टीकांवर शाहिदनं त्याची प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे.

नुकत्याच‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत कबीर सिंगच्या भूमिकेबद्दल शाहिद म्हणाला, ‘कबीर सिंगच्या भूमिकेला वेगवेगळे पैलू आहेत. काही त्रासदायक आणि भयानकसुद्धा आहेत. तर काही सकारात्मक गोष्टीसुद्धा आहेत. कबीर सिंगचा राग फक्त महिलांसाठी किंवा मुलींसाठी नाहीये. तर तो त्याच्या व्यक्तीमत्त्वाचा भाग आहे आणि तो फक्त स्त्रियांसाठीच आहे असं अजिबात या सिनेमात आजिबात दाखवण्यात आलेलं नाही.’

मुलगी जन्मल्यानंतर समीरा रेड्डीची भावुक पोस्ट, ब्रेस्टफिडिंगबद्दल म्हणाली...

 

View this post on Instagram

 

❤️🙏🏼

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

या मुलाखतीमध्ये शाहिदने अभिनेता संजय दत्तच्या बायोपिकचाही उल्लेख केला. ‘याआधी असे बरेच चित्रपट प्रदर्शित झाले आहेत ज्यांमधील भूमिका वादग्रस्त होत्या. पण तेव्हा अशाप्रकारची टिका किंवा ट्रोलिंग झालं नव्हतं. संजू या चित्रपटातील नायक आपल्या बायकोसमोर स्पष्टपणे सांगतो की त्याने ३०० मुलींसोबत सेक्स केलं आहे. लोकं कबीर सिंगवर जशी टीका करत आहेत तसं त्यांनी ‘संजू’च्या बाबतीत का नाही केलं,’ असा प्रश्न त्यानं उपस्थित केला.

शाहरुख-आमिरचा स्टारडम धोक्यात! येत्या काळात ‘हे’ असतील बॉलिवूडचे प्रसिद्ध चेहरे

‘संजू’बाबत प्रश्न उपस्थित करत असतानाच त्याने तो चित्रपट एन्जॉय केल्याचंही सांगितलं. शाहिद म्हणाला, ‘लोकांनी कसं वागलं पाहिजे यासाठी मी तो चित्रपट पाहिला नव्हता. पण एखादं पात्र कसं असतं हे जाणून घेण्यासाठी तो चित्रपट मी पाहिला होता.’ ‘कबीर सिंग’ने बॉक्स ऑफीसवर २५० कोटींहून जास्त गल्ला जमवला. यामध्ये शाहिदसोबत अभिनेत्री कियारा अडवाणीची मुख्य भूमिका आहे. तेलुगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हा हिंदी रिमेक असून हिंदी सिनेमाचं दिग्दर्शनही संदीप वांगा यांनीच केलं आहे.

‘थ्री इडियट्स’च्या या अभिनेत्याला 18 वर्षाच्या मुलीनं केलं लग्नासाठी प्रपोज

===============================================================

ऑन ड्युटी टिक टॉक VIDEO करणं महिला पोलिसांच्या अंगलट, निष्काळजीपणा भोवला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 12:49 PM IST

ताज्या बातम्या