करिनासोबतचा 'हा' सीन आजही विसरला नाही शाहिद कपूर

करिनासोबतचा 'हा' सीन आजही विसरला नाही शाहिद कपूर

मला आजही आठवतं की तो माझ्यासाठी सर्वात वाईट दिवस होता.

  • Share this:

मुंबई, 18 मे- बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडींमध्ये शाहिद कपूर आणि करिना कपूरचं नाव आवर्जुन घेतलं जायचं. आता दोघांचं ब्रेकअप होऊनही बरीच वर्ष लोटली. दोघांचे मार्ग वेगळे झाले असून दोघंही आपल्या आयुष्यात फार पुढे निघून गेली आहे. दोघांचं ब्रेकअप झालं असलं तरी दोघांनी कामाच्यामध्ये नातं कधी येऊ दिलं नाही. ब्रेकअपनंतर दोघांनी एकूण दोन सिनेमांत एकत्र काम केलं. विशेष म्हणजे दोन्ही सिनेमे सुपरहिट होते.

इम्तियाज अलीने त्याच्या जब वी मेट सिनेमासाठी दोघांना कास्ट केलं होतं. इम्तियाजने दीपिका आणि रणबीरलाही त्यांच्या ब्रेकअपनंतर तमाशा सिनेमात कास्ट केलं होतं. शाहिदने नुकतेच एका मुलाखतीत करिनासोबतच्या जब वी मेटमधील त्या सीनबद्दल चर्चा केली. या सीनमध्ये शाहिद करिनाला त्याच्यासोबत यायला सांगतो आणि करिना त्याला विरोध करते. तिच्या विरोधामुळे शाहिदच्या मनात अनेक भावना उमटतात.

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, सुपरस्टारच्या पत्नीने दिलं जसंच्या तसं उत्तर

या सीनबद्दल बोलताना शाहिद म्हणाला की, ‘माझ्यामते, हा एक असा सीन होता जो यापुढे १५ वर्षांनी जरी पाहिला तरी चांगल्या सीनमध्ये त्याची गणती केली जाईल. मला आजही आठवतं की तो माझ्यासाठी सर्वात वाईट दिवस होता. हा सीन आम्हाला शेड्युलच्या शेवटच्या शेड्युलमध्ये शूट करायचं होतं. माझ्यात ते भाव येतच नव्हते. लोकांना हा सीन फार आवडला पण या सीनमध्ये मी माझ्या भावनांना आवर घालण्याचा प्रयत्न करत होतो. हे प्रत्येक कलाकारासोबत होतो.’

टीव्ही अभिनेत्याला पोलिसांची ‘थर्ड डिग्री’, मॉलमधून थेट रुग्णालयात

मला अजूनही आठवतं की, इम्तियाज माझ्याबरोबर एकदा यावर बोलला होता. आम्ही मनालीमध्ये होतो आणि तो आणि मी शतपावली घालत होतो. मला या गोष्टीचा नेहमीच गर्व राहिला आहे की मी कोणतीही गोष्ट तयारीनिशी करतो. पण इम्तियाज मला म्हणाला की, ‘मला माहितीये की तू फार चांगला अभिनेता आहे. पण याबद्दल विचार करणं बंद कर.’ हा माझ्या आवडत्या सीनपैकी एक आहे. पण हा सीन पूर्ण करण्यासाठी मला फार अडचणी आल्या.

VIDEO- जेव्हा सर्वांसमोर शाहरुख म्हणाला, ‘माझं नशीब फार फुटकं होतं जेव्हा मी ऐश्वर्यासोबत...’

First published: May 18, 2019, 3:34 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading