ज्योतिषांना खुलं आव्हान, निकालाचं भाकीत करणाऱ्याला 21 लाखाचं बक्षिस

ज्योतिषांना खुलं आव्हान, निकालाचं भाकीत करणाऱ्याला 21 लाखाचं बक्षिस

अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सभा, सगळ्या सोशल मीडियावर या निवडणुकांचे वारे वाहतायत. पण याचा अनोखा फायदा अंधश्रद्धा निर्मुलन समितीने घेतला आहे.

  • Share this:

उदय जाधव प्रतिनिधी

मुंबई, 08 एप्रिल : लोकसभा निवडणूक निकालांचं भाकीत करणाऱ्या ज्योतीषांना थेट 21 लाख रुपयांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे. सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणूका 2019च्या चर्चा आहेत. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सभा, सगळ्या सोशल मीडियावर या निवडणुकांचे वारे वाहतायत. पण याचा अनोखा फायदा अंधश्रद्धा निर्मुलन समितीने घेतला आहे.

जो कोणता ज्योतिष लोकसभा निवडणुकांचं भाकीत करेन त्यांना 21 लाख रुपये बक्षिस मिळणार अशी घोषणा अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून करण्यात आली आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने आव्हान देत थेट २१ लाख रुपयांचं बक्षिसच जाहीर केलं.

ढोंगी ज्योतिषी समाज स्वास्थास हाणीकारक असून त्यांच्याकडून समाजाची फसवणुक होत आहे. त्यामुळे या ढोंगी ज्योतीषांची पोलखोल करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी ढोंगी ज्योतिषांना जाहीर आव्हान दिलं आहे.

या अनोख्या मोहिमेतून लोकांना फसवणाऱ्या ज्योतिषांचं पितळं उघडं पाडण्याचा प्रयत्न अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रयत्नामुळे लोकांना जागृकतेचा संदेश देण्यात येत आहे.

Trust Survey : 'या' राज्यांनी दाखवला मोदींवर विश्वास; 3 राज्य मात्र काँग्रेसच्या मागे

देशाचा विश्वास कुणावर? देशातल्या जनतेचा कुणाच्या बाजूनं कौल? पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कुणाचं नाव पुढे या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी फर्स्टपोस्टनं एक सर्वेक्षण केलं. या नॅशनल ट्रस्ट सर्व्हेनुसार पंतप्रधान म्हणून सर्वाधिक पसंती नरेंद्र मोदी यांच्या नावाला मिळाली आहे. देशाचे प्रश्न हाताळण्याबाबत कुठल्या राज्यांनी भाजपवर विश्वास दाखवला आहे आणि कुठल्या राज्यांनी काँग्रेसवर याचंही उत्तर या सर्वेक्षणातून मिळालं.

हेही वाचा: फडणवीसांचा डबल अॅटॅक, काँग्रेसनंतर पवारांनाही मोठा धक्का

पंजाब, मेघालय आणि मिझोराम या तीन राज्यांनी काँग्रेसवर विश्वास दाखवला आहे. बाकी बहुतेक सगळी राज्यं मोदींच्या पक्षावर विश्वास दाखवत आहेत.

भाजपवर विश्वास दाखवण्यामागे काय कारणं होती असं विचारल्यावर मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार, भाजप गरिबांसाठी काम करतं, देशाचा आर्थिक विकास, पक्षाची विचारसरणी, मोदींना पर्याय नाही या क्रमाने कारणं आली आहेत.

देशाचे प्रश्न हाताळण्याबाबत भाजपवर कोणत्या राज्यांनी जास्त विश्वास दाखवला?

अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, नागालँड, ओडिशा, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड

देशाचे प्रश्न हाताळण्याबाबत काँग्रेसवर कोणत्या राज्यांनी जास्त विश्वास दाखवला?

पंजाब, मेघालय, मिझोराम

Modi Vs Raga  कुणाची लोकप्रियता वाढली?

नरेंद्र मोदी यांच्या नावाला जानेवारीमध्ये 52.8 टक्के लोकांनी पसंती दर्शवली होती. हे प्रमाण जानेवारी 2019पेक्षा जास्त आहे. मार्च 2019मध्ये 63.4 टक्के लोकांनी मोदींना पसंती दिली होती.

राहुल गांधी यांची लोकप्रियता जानेवारीच्या तुलनेत कमी झालेली आहे. जानेवारीत 26.9 टक्के लोकांनी राहुल यांच्या नावाला पसंती दिली होती. आता मार्चमध्ये त्यांची लोकप्रियता 16.1 टक्क्यांवर आली आहे.या सर्वेक्षणात तिसऱ्या क्रमांकाची पसंती मिळाली आहे ममता बॅनर्जी यांच्या नावाला. याशिवाय मायावती आणि प्रियांका गांधी यांच्याही नावाला काही लोकांनी पसंती दर्शवली आहे. विशेष म्हणजे प्रियांका यांचं नाव मायावतींनंतर पसंतीचं आहे.

भावी पंतप्रधान म्हणून लोकांची पसंती कुणाला?

नेता                                             मार्च 2019             जानेवारी 2019

नरेंद्र मोदी                                  63.4%                  52.8%

राहुल गांधी                                 16.1%                   26.9%

ममता बॅनर्जी                                3.4%                   4.2%

मायावती                                     2.2%                  2.8%

प्रियंका गांधी                                 1.5%                   0.9%

SPECIAL REPORT : काँग्रेसला झालं काय? 2 नेते भाजपच्या वाटेवर!

First published: April 8, 2019, 10:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading