अटलजींच्या निधनाचं वृत्त ऐकताच ज्योतिरादित्य शिंदेंनी थांबवली रॅली

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाचं वृत्त ऐकताच काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपली रॅली थांबवली आणि अटलजींना श्रद्धांजली अर्पण केली. ज्योतिरादित्य हे शुक्रवारी वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यासाठी नवी दिल्लीत येणार आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांची गैरतंगज इथं रॅली होती. ही रॅली सुरू असतानाच त्यांना वाजपेयींच्या निधनाचं वृत्त समजलं त्यावेळी ते अटलजींच्या आठवणींनी गलबलून गेले. पुढचे तीन दिवसांचे सर्व कार्यक्रमही त्यांनी रद्द केले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 16, 2018 07:47 PM IST

अटलजींच्या निधनाचं वृत्त ऐकताच ज्योतिरादित्य शिंदेंनी थांबवली रॅली

(मनोज राठौर) भोपाळ, ता.16 ऑगस्ट : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाचं वृत्त ऐकताच काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपली रॅली थांबवली आणि अटलजींना श्रद्धांजली अर्पण केली. ज्योतिरादित्य हे शुक्रवारी वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यासाठी नवी दिल्लीत येणार आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांची गैरतंगज इथं रॅली होती. ही रॅली सुरू असतानाच त्यांना वाजपेयींच्या निधनाचं वृत्त समजलं त्यावेळी ते अटलजींच्या आठवणींनी गलबलून गेले. पुढचे तीन दिवसांचे सर्व कार्यक्रमही त्यांनी रद्द केले आहेत.

शिंदे घराण्याचं आणि वाजपेयींचं अतिशय जिव्हाळ्याचं नातं होतं. वाजपेयींचे वडिल हे शिंदे सरकारच्या शिक्षण खात्यात नोकरीला होते. राजमाता विजयाराजे शिंदे या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या होत्या. तर ज्योतिरादित्य यांचे वडिल माधवराव शिंदे हे सुरवातीच्या काळात जनसंघात होते मात्र नंतर त्यांनी आपला मार्ग बदलला आणि ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले. असं असलं तरी माधवराव आणि वाजपेयींचे शेवटपर्यंत अत्यंत चांगले संबंध होतं. तुम्ही भाजपमध्ये या असा आग्रह वाजपेयींनी त्यांना अनेकदा केला होता मात्र तो आग्रह माधवरावांनी कधी स्वीकारला नाही.

Loading...

वडिलांच्या जाण्याएवढच दु:ख- लता दीदी

ज्या वेळी माझे वडिल गेले त्या वेळी जे दु:ख झालं तेवढच दु:ख अटलींच्या जाण्याने झालं अशी प्रतिक्रीया गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी व्यक्त केली. अटलजी मला मुलगी मानायचे. त्यांच्या कवितांची कॅसेट जेव्हा मी काढली तेव्हा त्यांनी माझं तोंड भरून कौतुक केली.

अटलजी हे माणूस म्हणूनही खूप मोठे होते. वाजपेयी जेव्हा पाकिस्तानला बस घेऊन गेले त्यावेळी वाजपेयींनी मला फोन करून पाकिस्तानला येण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. तुम्ही आलात तर पाकिस्तानातल्या लोकांनाही आनंद होईल असं ते म्हणाले पण काही कामांमुळे मला जाता आलं नाही.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे मी नि:शब्द झालो आहे, शून्य झालो आहे. एका युगाचा अस्त झालाय अशी प्रतिक्रीया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलीय.

VIDEO: वाजपेयींच्या तब्येतीबद्दल ऐकून ढसाढसा रडली नात

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं गुरूवारी सायंकाळी दिल्लीतल्या 'एम्स' हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. गेल्या 9 आठवड्यांपासून त्यांच्यावर 'एम्स'मध्ये उपचार सुरू होते. चार दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खाल्यावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. वाढतं वय आणि दिर्घ आजारामुळे उपचारांनाही प्रतिसाद देणं त्यांनी बंद केलं होतं. शेवटपर्यंत डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली मात्र अटलजींची आजाराशी असलेली झुंज अखेर संपली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2018 07:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...