मध्य प्रदेश, 11 मे : काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधियांना एका शेतकऱ्याच्या रोषाला सामोरं जावं लागलं. मध्य प्रदेशच्या गुणामधून सिंधिया स्वतः उमेदवार आहेत. तिथे त्यांची एक छोटेखानी सभा होती. सभा सुरू व्हायच्या आधीच एक शेतकरी पुढे आला आणि माझ्या 2 लाखांच्या कर्जमाफीचं काय झालं, असं विचारू लागला. कार्यकर्त्यांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण तो काही शांत होईना. शेवटी सिंधियांनी त्याला समजवलं.