...आणि रिसाॅर्ट मालकाने केला सत्ता स्थापनेचा दावा, सुप्रीम कोर्टात हास्यकल्लोळ

...आणि रिसाॅर्ट मालकाने केला सत्ता स्थापनेचा दावा, सुप्रीम कोर्टात हास्यकल्लोळ

सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती ए के सिक्री यांनी व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड होणाऱ्या रिसॉर्ट मालकाच्या जोकचाही उल्लेख केला.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 मे : कर्नाटक सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. कर्नाटकात उद्या शनिवारी 4 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश भाजपला दिले आहे. सुप्रीम कोर्टाने काँग्रेसला दिलासा देत भाजपचा चांगलाच हादरा बसलाय.

न्यायमूर्ती ए. के. सिक्री, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती बोबडे या तीन सदस्यीय खंडपीठाने भाजपला उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहे.

सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती ए के सिक्री यांनी व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड होणाऱ्या रिसॉर्ट मालकाच्या जोकचाही उल्लेख केला.

काँग्रेसचे आमदार एका रिसार्टमध्ये थांबलेले आहे त्यांना राजभवनात येण्यासाठी सोमवारपर्यंत वेळ द्यावी अशी मागणी मुकुल रोहतगी यांनी केली होती.

यावर न्यायमूर्ती ए के सिक्री यांनी होय, आम्ही त्या रिसाॅर्टबदलचा जोक व्हाॅट्सअॅपवर वाचलाय असं सांगत व्हाॅट्सअॅपवरील जोक वाजून दाखवला आणि एकच हास्यकल्लोळ उडाला.

पाहुया तो जोक काय होता.....

Hello,

नमस्कार, हे गव्हर्नर चे ऑफीस आहे का ?

 होय

''माझ्याकडे 113 आमदारांची टीम आहे,

मी मुख्यमंत्री बनू शकतो का?''

" कोण बोलताय आपण?"

''मी रिसोर्टचा मालक बोलतोय,

जिथे ते आमदार लपलेत''

First published: May 18, 2018, 5:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading