06 मे : कोलकाता उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सी.ए.कर्नान यांनी सरन्यायाधीश जे.ए.खेहर यांना पाच वर्षांची सश्रम कारवासाची शिक्षा सुनावली. एवढंच नाहीतर त्यांच्यासह सुप्रीम कोर्टातील इतर सात न्यायमूर्तींनाही हीच शिक्षा सुनावलीये.
न्यायमूर्ती सी.ए.कर्नान यांनी कोर्टातील इतर न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. यासोबतच कोर्टाचा अवमान आणि न्याय प्रणालीचा गैरवापर यासारखे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहे. या प्रकरणात आता न्यायमूर्ती कर्नान यांनी आठही न्यायमूर्तींच्या विरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ (अॅट्रॉसिटी) आणि त्याचा सुधारणा कायदा २०१५ अन्वये स्वतःहून खटला दाखल केला होता. या प्रकरणात आठही न्यायमूर्तींना कर्नान यांनी दोषी ठरवलंय.
परंतु, सर्वोच्च न्यायालयाने याआधीच कर्नान यांच्याकडून कोर्टाच्या कामाचे अधिकार काढून घेतले आहे. सोबतच सर्व सरकारी आणि न्याय प्रक्रियेत कर्नान यांचे आदेश न मान्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.
कर्नान यांनी ज्या न्यायधीशांना शिक्षा सुनावली त्यामुळे प्रधान न्यायाधीश जे.ए.खेहर यांच्यासह दीपक मिश्रा, जे.चेलामेश्वर, रंजन गोगोई, न्यायमूर्ती मदन बी. लोकूर, पिनाकी चंद्र बोस, न्यायमुर्ती कुरियन जोसेफे आणि आर. बानुमती या न्यायमूर्तींचा समावेश आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा