ऐतिहासिक !,न्यायमूर्ती कर्नान यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास

ऐतिहासिक !,न्यायमूर्ती कर्नान यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास

कोलकाता हायकोर्टाचे न्यायमूर्ती सी एस कर्नन यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. कोर्ट आणि न्यायव्यवस्थेचा अवमान केल्याच्या त्यांच्यावर ठपका आहे.

  • Share this:

09 मे : भारतीय न्यायप्रणालीच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या न्यायमूर्तीला शिक्षा सुनावल्याची घटना आज घडलीये.  सेवेत असणारे कोलकाता हायकोर्टाचे न्यायमूर्ती सी एस कर्नन यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. कोर्ट आणि न्यायव्यवस्थेचा अवमान केल्याच्या त्यांच्यावर ठपका आहे.

पश्चिम बंगालच्या डीजीपींना कर्नन यांना ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वकील के के वेणुगोपाल यांनी कोर्टाला हे सुचवण्याचा प्रयत्न केला की, कर्नन यांना शिक्षा सुनावली तर न्यायव्यवस्थेवर तो मोठा बट्टा असेल. पण कोर्टाने हे मान्य केलं नाही. कोर्ट न्यायाधीश आणि सामान्य माणसात भेद करत नाही. कोर्टाचा अवमान केला तर शिक्षा ही भोगावीच लागेल, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला.

विशेष म्हणजे, कर्नन यांनी याआधी अनेक चुकीचे निर्णय दिले आहेत. पण काल त्यांनी कहरच केला. सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनाच त्यांनी सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2017 03:35 PM IST

ताज्या बातम्या