महाराष्ट्राचे सुपूत्र होणार सरन्यायाधीश? CJI रंजन गोगोई यांची शिफारस

न्यायमूर्ती बोबडे हे 47 वे मुख्य सरन्यायाधीश असतील. 23 एप्रिल 2021 पर्यंत न्यायमूर्ती बोबडे सरन्यायाधीश पदी असणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2019 12:26 PM IST

महाराष्ट्राचे सुपूत्र होणार सरन्यायाधीश? CJI रंजन गोगोई यांची शिफारस

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे (Justice Bobde) यांच्या नावाची सुप्रीम कोर्टा (Supreme Court)च्या पुढील सरन्यायाधीश (Chief Justice) पदासाठी शिफारस करण्यात आली आहे. सीजेआयचे न्यायमूर्ती रंजन गोगोई (Ranjan Gogoi) यांनी पुढील सरन्यायाधीशांसाठी केंद्र सरकारला पत्र लिहलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायाधीश बोबडे हे 18 नोव्हेंबरला सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. न्यायमूर्ती बोबडे हे 47 वे मुख्य सरन्यायाधीश असतील. 23 एप्रिल 2021 पर्यंत न्यायमूर्ती बोबडे सरन्यायाधीश पदी असणार आहे.

बोबडे यांचा 24 एप्रिल 1956 रोजी नागपुरात जन्म असून ते  सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, मुंबई आणि महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू देखील आहेत. अरविंद श्रीनिवास बोबडे असं त्यांच्या वडिलांचं नाव आहे. शरद अरविंदने नागपूर विद्यापीठातून बीए आणि एलएलबी पदवी घेतली आहे. शरद अरविंद बोबडे 29 मार्च 2000 रोजी अतिरिक्त न्यायाधीश म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा सदस्य झाले.

Loading...

16 ऑक्टोबर 2012 रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. 12 एप्रिल 2013 रोजी भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळवली. न्यायमूर्ती बोबडे यांचा कार्यकाळ 23 एप्रिल 2021 रोजी संपुष्टात येणार आहे. बोबडे यांना सर्वोच्च न्यायालयात आठ वर्षांचा कार्यकाळ असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2019 12:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...