Home /News /news /

तमाशापंढरीत लग्नाचा थाट अन् कोरोनाने वाजले की बारा....अखेर वरपित्यावर दाखल झाला गुन्हा

तमाशापंढरीत लग्नाचा थाट अन् कोरोनाने वाजले की बारा....अखेर वरपित्यावर दाखल झाला गुन्हा

12 वऱ्हाडी मंडळींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

जुन्नर, 25 ऑगस्ट : नारायणगाव येथील कृषी पर्यटन केंद्रात नुकताच एक शाही विवाह सोहळा पार पडला. या लग्नातील वधू नुकतीच कोरोना बाधित आढळली असून लग्न सोहळ्यात उपस्थित असलेल्या एकूण 12 वऱ्हाडी मंडळींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. समाज माध्यमात याबाबत चर्चा सुरू झाल्यावर अखेर नारायणगाव पोलिसांनी वर पिता आणि कृषी केंद्राच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. 13 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता मौजे हिवरे तर्फे नारायणगाव गावच्या हद्दीत असणाऱ्या हॉटेल ओसारामध्ये नारायणगाव येथील व्यापारी सह्याद्री भिसे व ओसारा कृषी पर्यटन केंद्राचे व्यवस्थापक व मालक लोकसेवक यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले नाही व तेथे येणाऱ्या लोकांसाठी कोणत्या प्रकारच्या आरोग्याची सुविधा उपलब्ध केली नसल्याचे दिसले. इतरांचं आरोग्य धोक्यात येईल त्याबाबत वर्तन केले म्हणून त्यांच्याविरुद्ध भादवि कलम 188, 269 कोविड-19 उपायोजना 2020 नियम 11 प्रमाणे 2 ,3,4, प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिली असून गुन्हा दाखल केला आहे. याबाबत प्रभारी अधिकारी नारायणगाव पोलीस स्टेशन सहायक पोलीस निरीसक्षक दत्तात्रय किसन गुंड यांनी माहिती दिली आहे. या सोहळ्याला वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, आजी माजी लोकप्रतिनिधी आणि व्यापारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. लग्नसमारंभाचे छायाचित्रीकरणासाठी फोटोग्राफर आमंत्रित करण्यात आले होते. याशिवाय वर बाप प्रगतशील शेतकरी आणि अस्सल मराठमोळा व्यापारी असल्याने त्याने व्यापारी मार्केटमध्ये फिरून लग्नाचे आग्रहाचे निमंत्रण दिले होते. या लग्नातल्या नवरीची आजी पुणे येथे दवाखान्यात उपचार घेत होत्या. मात्र त्यांना नातीचा लग्न सोहळा पाहाता यावा, 'नात' जावयाला आशीर्वाद देता यावे म्हणून आजीला तात्पुरता डिस्चार्ज घेऊन लग्नाला उपस्थित ठेवले. त्यानंतर पुन्हा पुणे येथे दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर 19 ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर नवरीसह एकूण 11 वऱ्हाडींचे कोरोना चाचणी अहवाल बाधित आले आणि नुकतंच नवरीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने लग्नाला उपस्थित राहिलेल्या वऱ्हाडी मंडळी चांगलेच धास्तावले आहेत. विवाह कार्यमालक आणि कृषी पर्यटन केंद्र मालकांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, दोन महिन्यापूर्वी धालेवाडी आणि हिवरे बुद्रुक येथील वधू वरांचा विवाह घोडेगाव रोडवरील मंगल कार्यालयात पार पडला होता. याला वाचा फुटल्यानंतर त्यांचेवर कारवाई झाली होती. जुन्नर पोलिसांनी दंड करून करवाई केली होती. या सोहळ्यावर नारायणगांव पोलिसांनी कारवाई केली आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या