S M L

मक्का मशीद स्फोट प्रकरण : निकाल देणाऱ्या न्यायाधीशांचा राजीनामा

मक्का मशीद स्फोट प्रकरणी निकाल देणारे न्यायाधीश के. रवींद्र रेड्डी यांनी निकालानंतर राजीनामा दिला. रेड्डी हे एनआयएच्या खास न्यायालयाचे न्यायाधीश होते.

Ajay Kautikwar | Updated On: Apr 16, 2018 09:08 PM IST

मक्का मशीद स्फोट प्रकरण : निकाल देणाऱ्या न्यायाधीशांचा राजीनामा

हैदराबाद,ता.16 एप्रिल: मक्का मशीद स्फोट प्रकरणी निकाल देणारे न्यायाधिश के. रवींद्र रेड्डी यांनी निकालानंतर राजीनामा दिला. रेड्डी हे एनआयएच्या खास न्यायालयाचे न्यायाधीश होते.

या निकालाचा आणि आपल्या राजीनाम्याचा काहीही संबंध नाही. आपण गेल्या काही काळापासून याबाबत विचार करत होतो. वयक्तिक कारणांमुळे आपण राजीनामा देत असल्याचं रेड्डी यांनी स्पष्ट केलं.

रेड्डी यांनी 11 वर्ष जुन्या असेलेल्या मक्का मशीद स्फोट प्रकरणाचा आज निकाल देत मुख्य आरोपी असिमानंद यांच्यासहीत सर्व आरोपींना दोषमुक्त केलं होतं.

रेड्डी यांच्या राजीनाम्यावर आता शंका व्यक्त करण्यात येत आहेत. ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विट करून यावर शंका व्यक्त केलीय. त्यांचा हा निर्णय आश्चर्य चकित करणारा असल्याचं ओवेसी यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2018 09:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close