जयललिता राहिल्या नाहीत, करुणानिधी आजारी, मग एमजीआर सरकार मी उत्तम चालवू शकतो - रजनीकांत

जयललिता राहिल्या नाहीत, करुणानिधी आजारी, मग एमजीआर सरकार मी उत्तम चालवू शकतो - रजनीकांत

तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची जागा भरून काढण्यासाठीच मी राजकारणात प्रवेश केला आहे असे सुपरस्टार रजनीकांत यांनी म्हटले आहे.

  • Share this:

06 मार्च : द थलाईवा म्हणजे सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूमध्ये राजकीय बदल घडवून आणण्याची घोषणा केली आहे. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची जागा भरून काढण्यासाठीच मी राजकारणात प्रवेश केला आहे असे सुपरस्टार रजनीकांत यांनी म्हटले आहे. सोमवारी त्यांनी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्याचवेळी त्यांनी ही भूमिका मांडली.

'जयललीता आता राहिल्या नाहीत आणि करुणानिधी सध्या आजारी आहेत. त्यामुळे एमजीआरप्रमाणे मीसुद्धा एक चांगलं सरकार चालवू शकतो.' असं रजनीकांत म्हणाले आहेत. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये सहभाग घ्यायचा की नाही याचा निर्णयही मी घेईन असेही रजनीकांत यांनी म्हटले आहे.

'राजकारणाचा प्रवास तसा अडचणीचा आहे पण मी तुम्हाला एमजीआर सारखं सरकार आणि चांगल प्रशासन देऊ शकतो. देव माझ्या बाजूने आहे. मला खात्री आहे की मी तमिळनाडूमध्ये बदल घडवू शकतो.' असं ते म्हणाले. त्यामुळे इतरांचं माहित नाही पण तमिळनाडूमध्ये अच्छे दिन येतील का हेच पाहणं महत्त्वाचं आहे.

 

First published: March 6, 2018, 9:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading