News18 Lokmat

माजी आमदारावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या पत्रकारितेच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

माजी आमदारावर लैगिंक शोषणाचे आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीचा हुंडाबळी गेला का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 3, 2019 02:46 PM IST

माजी आमदारावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या पत्रकारितेच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

भोपाळ, 03 मे : माजी आमदार हेमंत कटारेंवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे. पत्रकारितेचं शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थिनीनं विष पिऊन आत्महत्या केली आहे. उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील हलदपूर पोलिस ठाण्यातंर्गत ही घटना घडली आहे. विद्यार्थिनीनं आत्महत्या का केली? याबाबत ता पोलिस तपास सुरू आहे.


ऑनलाइन व्यवहारांसाठी Google Payचा पहिला नंबर, BHIMचा नंबर माहीत आहे?

सहा महिन्यावर आलं होतं लग्न

दरम्यान, आत्महत्या करणाऱ्य़ा विद्यार्थिनीचं लग्न हे सहा महिन्यांवर आलं होतं. सब इन्स्पेक्टरसोबत या मुलीचं लग्न होणार होतं. यावेळी मुलीच्या नातेवईकांनी केलेल्या आरोपामुळं या प्रकरणाचा गांभीर्य आणकी वाढलं आहे. सब इन्स्पेक्टर असलेल्या बॉबीनं हुंडा मागितला. त्यामुळे विद्यार्थिनीनं आत्महत्या केली असा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून चौकशीला सुरूवात केली आहे. हुंड्याच्या आरोपामुळे या साऱ्या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे. तपासाअंती या साऱ्या प्रकरणातील सत्य बाहेर येईल.

Loading...


VIDEO: फानी चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे किनाऱ्यावर आली कासवं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 3, 2019 02:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...