S M L

बाबा राम रहीमचा 'पूरा सच' 'या' पत्रकाराने आणला जगासमोर !

'पूरा सच' दैनिकात हे पत्र छापल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सर्वत्र रामचंद्र यांच्या निडर पत्रकारितेचं कौतुक होऊ लागलं होतं.

Sachin Salve | Updated On: Aug 28, 2017 04:04 PM IST

बाबा राम रहीमचा 'पूरा सच' 'या' पत्रकाराने आणला जगासमोर !

28 आॅगस्ट : साध्वी बलात्कार प्रकरणी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला पंचकूला सीबीआय कोर्टाने दोषी ठरवलंय. या प्रकरणाचे  आता अनेक खुलासे होत आहेत. पण या प्रकरणाची पोलखोल करण्याची भूमिका बजावली होती पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी...

2002 मध्ये काही अज्ञात महिलांनी राम रहीमच्या डेऱ्यात लैंगिक शोषण होत असल्याचं पत्रक प्रसिद्ध केलं होतं. त्यानंतर रामचंद्र छत्रपती यांनी या प्रकाराचा माग काढत राम रहीमचा खराचेहरा लोकांसमोर आणला. रामचंद्र यांचं 'पूरा सच' नावाचं स्थानिक दैनिक होतं. या दैनिकात त्यांनी या अज्ञात महिलांचं पत्रच प्रसिद्ध केलं. या बातमीमध्ये दोन साध्वींवर बलात्कार आणि मारहाण केल्याचा उल्लेख केला होता.

'पूरा सच'मुळे एकच खळबळराम रहीमचा या परिसरात एवढा दबदबा होता की त्याच्याविरोधात कुणी बोलण्यास पुढे येतं नव्हतं. पण, पहिल्यादाच एका दैनिकात त्याच्या काळ्या कृत्याचा भांडाफोड झाला. 'पूरा सच' दैनिकात हे पत्र छापल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सर्वत्र रामचंद्र यांच्या निडर पत्रकारितेचं कौतुक होऊ लागलं होतं. त्यांच्या या भूमिकेनंतर डेऱ्यातल्या काही साध्वींनी आतली माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली होती.

पत्र छापल्यामुळे हल्ला

या घटनेनंतर 24 आॅक्टोबर 2002 ला रामचंद्र यांच्यावर जीवेघेणा हल्ला झाला. त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी 5 गोळ्या झाडल्या होत्या. जवळपास त्यांनी महिनाभर मृत्यूशी झुंज दिली. पण 21 नोव्हेंबर 2002 मध्ये रामचंद्र यांचा दिल्लीतील अपोलो हाॅस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. . राजकीय दबावामुळे रामचंद्र यांचा जबाबही नोंदवण्यात आला नव्हता. एवढंच नाहीतर पोलिसांनी एफआयआरमध्ये राम रहीमच्या नावाचा उल्लेखही केला नव्हता. त्यांचा मुलगा अंशुल छत्रपती हा त्यावेळी 21 वर्षांचा होता. त्यांनी आपल्या वडिलांना न्याय मिळावा यासाठी प्रत्येक ठिकाणी मागणी केली. पण कुणीही साथ दिली नाही. अखेर त्यांनी कोर्टात याचिका दाखल करून सीबीआय तपासाची मागणी केली.

Loading...
Loading...

सीबीआयकडे तपास

तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे साध्वींनी पत्र लिहून न्याय मागितला होता. त्यानंतर हे प्रकरण आणखी प्रकाशझोतात आलं. एक वर्षांनंतर डिसेंबर 2003 मध्ये या प्रकरणाचा संपूर्ण तपास पोलिसांकडून काढून सीबीआयकडे सोपवण्यात आला.  सीबीआयचे तपास अधिकारी सतीश डागर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. डागर यांनी पीडित साध्वींचा शोध घेतला आणि त्यांना जबाब देण्यास तयार केलं. साध्वींनी दिलेल्या जबाबानंतर राम रहीमच्या विरोधात प्रकरणाला खरे वळण मिळाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2017 02:03 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close