मुंबई, 06 जानेवारी : मुंबईतल्या गोरेगावमध्ये एका पत्रकाराचा मृत्यू संशयास्पद मृत्यू झाला आहे. मुंबईच्या सिद्घार्थनगरमध्ये टेरेसवरून पडून या पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. आदर्श मिश्रा असं या पत्रकाराचं नाव आहे.
आदर्श मिश्रा यांचा घराच्या टेरेसवरून पडून मृत्यू झाला आहे. दरम्यान, त्यांनी आत्महत्या केली की हत्या याबाबत सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी आदर्श मिश्रा यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छदनासाठी पाठवण्यात आला आहे.
तर पोलीस सध्या घटनास्थळावरून काही संशयास्पद वस्तू हाती लागते का याचा शोध घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणात मिश्रा यांच्य कुटुंबाचीही चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर टेरेसवर जाताना मिश्रा यांनी कोणी पाहिलं का? ते टेरेसवर एकटेच होते का? याचा आता पोलीस तपास करत आहेत.
Special Report : कोण होणार पहिला मराठी पंतप्रधान?