जॉनी डेपने पत्नीवर केला छळवणूकीचा आरोप, म्हणाला ‘तिने माझं बोट मोडलं होतं’

जॉनी डेपने पत्नीवर केला छळवणूकीचा आरोप, म्हणाला ‘तिने माझं बोट मोडलं होतं’

एंबरने एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला, ज्यात जॉनी तिच्यासोबत गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न करत असल्याचं ती दाखवत होती.

  • Share this:

हॉलिवूड स्टार जॉनी डेपची तीन वर्षांपूर्वी घरगुती हिंसेविरोधात निंदा करण्यात आली होती. जॉनीच्या पत्नीने एंबर हर्डने आरोप केला होता की, ‘जॉनी दारू आणि अमली पदार्थाच्या आहारी गेला आहे आणि त्या नशेत मला एंबरला मारहाणही केली आहे.’ ती पुढे म्हणाली की, रागात येऊन जॉनीने तिच्यावर वाइनचा ग्लास फेकून मारला होता. तर याप्रकरणी जॉनीची एक्स वाइफ वेनेसा म्हणाली की, जॉनी कधीच कोणत्या महिलेवर हात उचलत नाही. एंबर खोटारडी असून तिला पैशांसाठी हे सर्व करत आहे.

आता तीन वर्षांनंतर जॉनीने या सर्वप्रकरणावर आपलं स्पष्टिकरण दिलं आहे. जॉनीने पत्नी एंबरवर तब्बल ३४७ कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. असं म्हटलं जातं की, जॉनीने पुराव्यानिशी एंबरवर हा आरोप केला आहे की, तिने जॉनीला बुक्का मारला होता आणि त्याचे बोट मोडले होते. या रिपोर्टमध्ये एंबरने त्याच्यावर दारुची बाटली फेकून मारल्याचाही आरोप जॉनीने केला आहे.

२०११ मध्ये जॉनी आणि एंबर हर्ड पहिल्यांदा भेटले होते. दोघांनी ‘द रम डायरीज’ या सिनेमात एकत्र काम केलं होतं. सुमारे चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१५ मध्ये दोघांनी लग्न केलं आणि २०१५ मध्ये लग्न केलं. या कपललं हॉलिवूडचं सर्वोत्कृष्ट कपलही म्हटलं जायचं. पण फक्त एका वर्षात दोघांमध्ये अंतर यायला लागलं.

एवढंच नाही तर एंबरने जॉनीला सर्व प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न केला. एंबरने एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला, ज्यात जॉनी तिच्यासोबत गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न करत असल्याचं ती दाखवत होती. मात्र या व्हिडिओमुळे तिला समर्थन कमी आणि टीकाच जास्त मिळाली.

VIDEO: मनोहर पर्रिकरांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचले मोदी

First published: March 18, 2019, 5:11 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading