मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

IPS Officer Salary : कठीण प्रशिक्षणानंतर तयार होतात IPS अधिकारी; उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्यांना इतका असतो पगार

IPS Officer Salary : कठीण प्रशिक्षणानंतर तयार होतात IPS अधिकारी; उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्यांना इतका असतो पगार

Jobs, IPS Salary, UPSC Exam, Sarkari Naukri : देशसेवेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. निवड झालेल्यांना चांगल्या पगारासोबतच इतर अनेक सुविधा (IPS Officer Salary) मिळत असतात.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : लोकांमध्ये यूपीएससी परीक्षा आणि सरकारी नोकरीची (Sarkari Naukri) क्रेझ एवढी आहे की, या परीक्षांची तयारी करण्यासाठी तरुण-तरुणी अनेक वर्षे मेहनत करतात. देशसेवेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांना हीच परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. निवड झालेल्यांना चांगल्या पगारासोबतच इतर अनेक सुविधा (IPS Officer Salary) मिळत असतात.

भारतीय पोलीस सेवा (IPS) अंतर्गत निवडलेले अधिकारी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काम करतात. त्यांना एसपीपासून (SP - Superintendent of police - सुपरिटेंडंट ऑफ पोलीस - पोलीस अधीक्षक) डीआयजी (DIGP - Deputy Inspector General of Police - डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस - पोलीस उपमहानिरीक्षक), आयजीपी (IGP - Inspector General of Police - इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस - पोलीस महानिरीक्षक) आणि डीजीपीपर्यंत (DGP - Director-General of Police - डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस - पोलीस महासंचालक) बढती मिळते. यासाठी आयपीएस अधिकाऱ्यांना कठोर प्रशिक्षण (IPS Officer Training) घ्यावं लागतं.

आयपीएस अधिकाऱ्याचा पगार किती असतो?

IPS ला 7 व्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) पगार मिळतो. याअंतर्गत त्यांचं किमान मासिक वेतन 56 हजार 100 रुपये आहे. वेतनाव्यतिरिक्त, आयपीएस अधिकाऱ्यांना महागाई भत्त्यासह इतर अनेक भत्तेही दिले जातात. डीजीपी पदावर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला सर्वाधिक पगार मिळतो. त्यांना दरमहा सुमारे 2 लाख 25 हजार रुपये (डीजीपी पगार) मिळतात.

या विशेष सुविधाही आहेत उपलब्ध

आयपीएस अधिकाऱ्यांना घर, वाहन आणि इतर विशेष सुविधा वेगवेगळ्या पे बँडच्या (IPS Officer Pay Band) आधारे दिल्या जातात. त्यांना पदानुसार घरकाम, सुरक्षा रक्षक, वाहनचालक आदी सुविधाही दिल्या जातात. तसंच, वैद्यकीय उपचारांव्यतिरिक्त दूरध्वनी आणि वीजबिलही सरकार भरतं. आयपीएस अधिकाऱ्यांना देशाबाहेर शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक रजा (Education Leave) घेण्याची परवानगी आहे. याचा खर्च सरकार उचलतं. निवृत्तीनंतर त्यांना आजीवन पेन्शनही (Pension Scheme) मिळते.

हे वाचा - दिवाळीनंतर एसी, टीव्ही, फ्रीजही महागणार; 10 टक्क्यांपर्यंत दरवाढीची शक्यता

प्रत्येक पदासाठी विशेष वेतन निश्चित केलं आहे

पोलीस उपअधीक्षक - डीएसपी या पदावरील आयपीएस अधिकाऱ्याला 56 हजार 100 रुपये पगार मिळतो.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ASP - Additional Superintendent of police) - यांना 67 हजार 700 रुपये पगार मिळतो.

पोलीस अधीक्षक - एसपी या पदाला 78 हजार 800 रुपये पगार मिळतो.

हे वाचा - बापरे! 14 वर्षांच्या मुलाने खाल्ले तब्बल 16 Toothbrush; एक वाईट सोडवण्यासाठी केला भयंकर उपाय!

वरिष्ठ पोलीस अधीक्षक - (SSP - सीनियर सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस) यांचे वेतन 1 लाख 18 हजार 500 रुपये आहे.

पोलीस उपमहानिरीक्षक - (DIGP) अधिकाऱ्याला 1 लाख 31 हजार 100 रुपये मासिक वेतन मिळतं.

पोलीस महानिरीक्षक - IGP वेतन 1 लाख 44 हजार 200 रुपये आहे.

अतिरिक्त पोलीस महासंचालक - (ADGP - Additional Director-General of Police) यांचं मासिक वेतन 2 लाख 5 हजार 400 रुपये आहे.

पोलीस महासंचालक - डीजीपी पदावर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला सर्वाधिक पगार मिळतो. त्यांचा मासिक पगार 2 लाख 25 हजार रुपये आहे.

First published:

Tags: IPS Officer, Police