Home /News /news /

10वी- 12वी पास असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची संधी, परीक्षा न घेता होणार निवड

10वी- 12वी पास असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची संधी, परीक्षा न घेता होणार निवड

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीनं टेक्निकल अप्रेंटिसच्या 100 पदांसाठी भरती सुरू केली आहे.

    मुंबई, 08 मार्च : तुम्ही दहावी किंवा बारावी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीनं टेक्निकल अप्रेंटिसच्या 100 पदांसाठी भरती सुरू केली आहे. 10वी आणि 12 वी पास असणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी यासाठी अर्ज करू शकतात. जाणून घ्या कसा भरायचा अर्ज आणि कशा पद्धतीनं निवड होणार आहे. टेक्निकल अप्रेंटिसपदांसाठी एकूण 100 जागा रिक्त आहेत. त्यापैकी इलेक्ट्रॉनिक, मॅकेनिकल, धातु विज्ञान, रासायनिक, सिव्हिल,उपकरण अशा क्षेत्रात या जागा उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी 17 मार्चपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कऱणं आवश्यक आहे. त्य़ामध्ये फेब्रुवारी अखेरपर्यंत कमीत कमी इच्छुक उमेदवाराचं वय 18 ते जास्तीत जास्त 28 वर्ष असावं. अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही. उमेदवाराची निवड मेरिटलिस्टनुसार होणार आहे. त्यामुळे उमेदवाराला कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. हे वाचा-तुम्ही चुकीच्या वेळी तर बदाम खात नाहीत ना? 'ही' आहे बदाम खाण्याची योग्य वेळ https://portal.mhrdnats.gov.in/boat/commonRedirect/registermenunew!registermenunew.action या संकेतस्थळाला भेट द्या, तिथे आपलं लॉग इन आयडी तयार करा. त्यानंतर तिथे दिलेली माहिती अपलोड करा. भरलेली माहिती योग्य आहे का? हे तपासून पाहण्यासाठी प्रीव्हिवू पर्याय निवडा माहिती योग्य भरली आहे हे कन्फर्म झालं की सबमिट पर्यायावर क्लीक करा. तुमचा अर्ज भरला जाईल. त्यानंतर मेरिट लिस्टवर उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. हे वाचा-राशीभविष्य : वृशभ आणि कुंभ राशीच्या लोकांना आज मिळणार खऱ्या प्रेमाचा आनंद
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या