मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

JNU हिंसा: दिल्ली पोलिसांनी जारी केले हल्लेखोरांचे फोटो; आयशी घोषसह 9 जणांचा समावेश

JNU हिंसा: दिल्ली पोलिसांनी जारी केले हल्लेखोरांचे फोटो; आयशी घोषसह 9 जणांचा समावेश

दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने पत्रकार परिषद घेत हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख पटली असल्याची माहिती दिली आहे.

दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने पत्रकार परिषद घेत हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख पटली असल्याची माहिती दिली आहे.

दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने पत्रकार परिषद घेत हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख पटली असल्याची माहिती दिली आहे.

  • Published by:  Renuka Dhaybar
नवी दिल्ली, 10 जानेवारी : रविवारी रात्री जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) हिंसाचाराच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी हल्लेखोरांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयशी घोष हिच्यासह 9 हल्लेखोर होते. प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये आरोपींची नावंही देण्यात आली आहेत. यात जेएनयूचे माजी विद्यार्थी चुनचुन कुमार, सुचेता तालुकदार आणि प्रिया रंजनदेखील आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने पत्रकार परिषद घेत हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख पटली असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये चुनचुन कुमार, पंकज मिश्रा, योगेंद्र भारद्वाज, प्रिया रंजन, विकास पटेल, डोलन, आयशी घोषसह इतरांची नावं आहेत. दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते एमएस रंधावा म्हणाले की, जेएनयू हिंसाचारात चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे. माहिती योग्य ठेवणे हा संक्षिप्त उद्देश आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे डीसीपी जॉय टिर्की म्हणाले की, जेएनयू हिंसाचार प्रकरणाच्या तपासाबद्दल बरीच चुकीची माहिती पसरली जात आहे. 1 जानेवारी ते 3 जानेवारी या कालावधीत नोंदणी करायची होती. पण SFI, AISA, AISF आणि DSF विद्यार्थी संघटनांनी विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यास प्रतिबंधित केले. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना धमकावले जात होते. यानंतर हा वाद आणखी वाढत गेला आणि 5 जानेवारी रोजी पेरियार आणि साबरमती वसतिगृहातील काही खोल्यांवर हल्ला करण्यात आला. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे डीसीपी जॉय टिर्की यांनी सांगितले की, जेएनयूमध्ये हिंसाचार करण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुपदेखील तयार केले गेले होते. मुखवटा घातलेल्या लोकांना माहित होते की त्यांना कोणत्या खोलीत जायचे आहे. हिंसाचाराचे सीसीटीव्ही फुटेज सापडले नाहीत. पण, आम्ही व्हायरल व्हिडिओद्वारे आरोपीची ओळख पटवली आहे. आम्ही याबद्दल 30-32 साक्षीदारांशी देखील बोललो आहे. असं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं आहे.
First published:

पुढील बातम्या