Home /News /news /

कोरेगाव भीमा प्रकरणी मला टार्गेट केलं जातंय- जिग्नेश मेवाणी

कोरेगाव भीमा प्रकरणी मला टार्गेट केलं जातंय- जिग्नेश मेवाणी

आपलं मौन सोडलंय. भीमा-कोरेगाव प्रकरणी आपल्याला संघ आणि भाजपवाले हकनाक टार्गेट करताहेत, असा आरोप जिग्नेश मेवाणी यांनी केलाय.

05 जानेवारी, नवी दिल्ली : भीमा-कोरेगाव प्रकरणावर अखेर जिग्नेश मेवाणी यांनी अखेर आपलं मौन सोडलंय. भीमा-कोरेगाव प्रकरणी आपल्याला संघ आणि भाजपवाले हकनाक टार्गेट करताहेत, असा आरोप जिग्नेश मेवाणी यांनी केलाय. आपण कुठलंही भडकाऊ भाषण केलं नाही. अथवा बंदला समर्थन दिलं नाही. तरीही मला विनाकारण टार्गेट करण्यात येतंय. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी भीमा-कोरेगाव प्रकरणावर का बोलत नाहीत, असा सवालही मेवाणी यांनी केलाय. ९ तारखेला दिल्लीत युवा-हुंकार रॅली काढण्याची घोषणाही जिग्नेश मेवाणी यांनी केली. त्यानंतर संविधान आणि मनुस्मृती घेऊन पंतप्रधानांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गुजरात निकालानंतर महाराष्ट्रातल्या काही भाजपविरोधी संघटनांनी जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिदला विशेष आमंत्रित करून पुण्यातल्या शनिवारवाड्यावर पेशव्यांच्या विरोधात एल्गार परिषद भरवली होती. या सभेत जिग्नेश मेवाणी यांनी मोदी सरकारची तुलना आधुनिक पेशवाईची करत भाजप आणि संघवाल्यांविरोधात जोरदार हल्लाबोल चढवला होता. याच भाषणात जिग्नेश मेवाणी यानी भडकाऊ भाषा वापरल्याचा आरोप होत त्यांच्यावर गुन्हाही दाखल झालाय.
First published:

Tags: Bhima koregoan, Jignesh mewani

पुढील बातम्या