आता अनुष्का शर्मा हातात घेणार बॅट, विराटसोबत करणार क्रिकेटचा सराव!

आता अनुष्का शर्मा हातात घेणार बॅट, विराटसोबत करणार क्रिकेटचा सराव!

भारतीय क्रिकेटमध्ये त्यांचे वेगळे स्थान आहे. त्यांनी महिलांचे क्रिकेट अगदी जवळून बदलताना पाहिले आहे. दिग्गज खेळाडू आणि तरुण खेळाडूंसहदेखील त्या खेळल्या.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जानेवारी : भारताची अनुभवी महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी (Jhulan Goswami)जगातील सर्वोत्तम महिला वेगवान गोलंदाज आहे. भारतीय क्रिकेटमध्ये त्यांचे वेगळे स्थान आहे. त्यांनी महिलांचे क्रिकेट अगदी जवळून बदलताना पाहिले आहे. दिग्गज खेळाडू आणि तरुण खेळाडूंसहदेखील त्या खेळल्या. त्यांच्या आयुष्यावर लवकरच बायोपिक बनणार आहे. न्यूज 18च्या म्हणण्यानुसार, बॉलीवूडला झुलन यांचं आयुष्य लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि म्हणूनच त्यांच्या बायोपिकची योजना आखली आहे. यासाठी भारतीय कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा मोठ्या पडद्यावर झुलन गोस्वामीची भूमिका साकारताना दिसण्याची शक्यता आहे.

37 वर्षीय झुलन यांनी 2002मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि त्या भारताच्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक बनल्या. त्यांनी भारताकडून 10 कसोटी, 182 एकदिवसीय आणि 68 टी -20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी 321 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये झुलन यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.

इतर बातम्या - VIDEO: या बाळाची आई कोण आहे? पोलिसही आहेत आईच्या शोधात, पाहा स्पेशल रिपोर्ट

सुपरहिट आहे खेळाडूंची बायोपिक

बॉलिवूडने बर्‍याच खेळाडूंची बायोपिक बनविली आहे, ती उत्तम हिटदेखील ठरली आहे. एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी (MS Dhoni: The Untold Story), मेरी कॉम, भाग मिल्खा भाग या सिनेमांनाही चाहत्यांनी पसंती दिली. खरंतर बॉलिवूडमध्ये खेळाडूंवर बायोपिक बनवण्याचा ट्रेंड बनला आहे.

इतर बातम्या - मंदीचा फटका! OYO रूम्स करणार 1 हजार कर्मचाऱ्यांची कपात

बातमीनुसार, झुलनची बायोपिक दिग्दर्शन विवेक कृष्णानी करणार आहेत. अहवालांविषयी बोलताना अनुष्का शर्मा शनिवारी ईडन गार्डन्समध्ये शूटिंगसाठी कोलकाता शहरात येणार आहे. या दिवसासाठी मैदान आणि ड्रेसिंग रूम रिकाम्या ठेवण्यात आल्या आहेत. अनुष्काला मदत करण्यासाठी झुलन गोस्वामीसुद्धा स्टेडियममध्ये हजर असण्याची शक्यता आहे. तर तिला या सिनेमाच्या तयारीसाठी विराट कोहलीदेखील मदत करू शकतो.

इतर बातम्या - बडोदा येथे ऑक्सिजनच्या कंपनीत भीषण स्फोट, 7 कामगारांचा होरपळून मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 11, 2020 06:42 PM IST

ताज्या बातम्या