S M L

मदर तेरेसा यांच्या संस्थेवर मुलं चोरीचा आरोप

आरोप झाला असून, तो सिद्ध झाल्यास मदर तेरेसा यांना दिलेला भारतरत्न पुरस्कार काढून घ्यावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख राजीव तुली यांनी केली

Updated On: Jul 12, 2018 10:52 PM IST

मदर तेरेसा यांच्या संस्थेवर मुलं चोरीचा आरोप

झारखंड, 12 जुलै : मदर तेरेसा यांच्याशी संबंधित एनजीओवर लहान बाळाच्या विक्रीचा आरोप झाला असून, तो सिद्ध झाल्यास मदर तेरेसा यांना दिलेला भारतरत्न पुरस्कार काढून घ्यावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख राजीव तुली यांनी केली आहे.

भारतरत्न या पुरस्काराला डाग लागलेला भारतीयांना आवडणार नाही असं तुली यांनी एका इंग्रजी मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.

1980 मध्ये मदर तेरेसा यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मदर तेरेसा यांना व्हॅटिकनने गेल्या वर्षी संतपद बहाल केलं, त्यांनी कधीच लोकांच्या भल्यासाठी काम केलं नाही. तर धर्मांतर हा त्यांचा मुख्य हेतू होता असा आरोपही तुली यांनी केला आहे.काय आहे प्रकरण ?

झारखंडची राजधानी रांचीमध्ये मिशनरी आॅफ चॅरिटीमध्ये एका लहान मुलाला 1.2 लाखांना विकण्यात आल्याचा आरोप एका दाम्पत्याने केलाय. चॅरिटीच्या कर्मचाऱ्याने 14 दिवसात या मुलाची दुसऱ्या एका दाम्पत्याला विक्री केली असल्याचा आरोप आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 12, 2018 10:52 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close