Elec-widget

कृषी क्षेत्रासाठी बजेटमध्ये काय तरतूद ?

कृषी क्षेत्रासाठी बजेटमध्ये काय तरतूद ?

आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पात नोकरदारांना फारसं काही मिळालं नसलं तरी कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आलीय. कृषी पतपुरवठ्यासाठी तब्बल 11 लाख कोटींची तरतूद करण्यात आलीय. यापूर्वी हीच रक्कम 8.5 लाख कोटी इतकी होती.

  • Share this:

01 फेब्रुवारी, नवीदिल्ली : आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पात नोकरदारांना फारसं काही मिळालं नसलं तरी कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आलीय. कृषी पतपुरवठ्यासाठी तब्बल 11 लाख कोटींची तरतूद करण्यात आलीय. यापूर्वी हीच रक्कम 8.5 लाख कोटी इतकी होती. या वाढीव तरतूदीमुळे शेतकऱ्यांना वाढीव कर्जपुरवठा उपलब्ध होणार आहे. यासोबतच यापुढे सर्व शेती माल हमीभावाच्या कक्षेत आणण्याचं आश्वासनही या बजेटमध्ये देण्यात आलंय. आतापर्यंत फक्त 24 शेतीमालांना हमीभाव मिळत होता. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचं आश्वासन या बजेटमध्ये देण्यात आलंय. याशिवाय छत्तीसगढमधील हट बाजाराच्या धर्तीवर देशभरात 22 हजार आठवडी बाजार उभारण्याची घोषणाही जेटलींनी या अर्थसंकल्पात केलीय. 2022 पर्यंत कृषी उत्पन्नात दुपट्टीने वाढवण्याचं उद्दीष्ठही सरकारने निश्चित केलंय. त्यासाठी कृषी क्षेत्राशी संबंधीत उद्योगांना विविध सवलतीही देण्यात आल्यात. कृषी उद्योग कंपन्यांना देखील पहिली पाच वर्षे 100 टक्के करसवलत जाहीर करण्यात आलीय.

कृषी क्षेत्रासाठीच्या ठळक तरतुदी 

- शेतीच्या कर्जासाठी ११ लाख कोटींचा निधी राखीव

- अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी १४०० कोटींची तरतूद

- शेतीमालाच्या मार्केटिंगवर भर

Loading...

- शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर

- २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार

- कृषी उत्पादन वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न

- राष्ट्रीय बांबू मिशनसाठी २९० कोटी रुपये

- देशभरात ४२ फूडपार्क उभारणार

- अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी १४०० कोटींची तरतूद

- पशुधन विकास आणि मत्स्योद्योगांसाठी १० हजार कोटींची तरतूद

- ऑपरेशन ग्रीनसाठी ५०० कोटींची तरतूद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2018 02:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...