रुग्णालयात नेताना 2 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू; बंदमुळे झाला उशीर, वडिलांचा आरोप

रुग्णालयात नेताना 2 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू; बंदमुळे झाला उशीर, वडिलांचा आरोप

  • Share this:

बिहार, 10 : बिहारमध्ये भारत बंद आंदोलनाच्या दरम्यान जहानाबाद इथं एका दोन वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय. बेबी कुमारी असं या चिमुरडीचं नाव आहे. सोमवारी सकाळी तब्येत बिघडल्यामुळे तिचे वडील प्रमोद मांझी हे तिला घेऊन रुग्णालयात जात होते. पण ठिकठिकाणी आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली होती. रुग्णालयात उशिरा पोहोचल्यामुळे वाटेत या चिमुरडीचा करूण अंत झाला.

जर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली नसती तर आम्ही वेळेवर रुग्णालयात पोहोचू शकलो असतो आणि मुलीचा जीव वाचवू शकलो असतो असा आरोप प्रमोद मांझी यांनी केलाय. नेहमी बालाविगहाहुन जहानाबादकडे जाण्यासाठी तासभर लागत असतो. पण आज जाण्यासाठी तीन तास लागले. मी होरिलगंजपर्यंतच पोहोचू शकलो, जहानाबाद शहरापासून काही अंतरावर माझ्या मुलीने अखेरचा श्वास घेतला अशी माहिती त्यांनी दिली.

जहानाबाद हा राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चा (हम) यांचा बालेकिल्ला आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरजेडी समर्थकांना सकाळी ठिक-ठिकाणी आंदोलन केली होती. पण या घटनेवर दोन्ही पक्षांनी बोलण्यास नकार दिलाय.

माझ्या मुलीला डायरिया झाला होता, ज्यामुळे तिच्या शरीरात पाणीची कमरता आली होती. जर आम्ही वेळीच रुग्णालयात पोहोचलो असतो तर तिला सलाई लावता आली असती आणि उपचार सुरू झाले असते त्यामुळे तिचा जीव वाचला असता असंही प्रमोद मांझी यांनी सांगितलं.

परंतु, जहानाबादचे एसडीओ यांनी वाहतूक कोंडीमुळे मुलीचा मृत्यू झाला याचं खंडन केलंय. मुलीच्या कुटुंबियांनी घरूनच निघण्यास उशीर केला होता, त्यामुळे तिचा मृत्यू झाला अशी माहिती दिली.

काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात भारत बंद पुकारलाय. बिहारमध्ये आरजेडीसह सर्व विरोधी पक्ष आंदोलनात सहभागी झाले होते.

==============================

VIDEO : घोषणाबाजीवरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये भर रॅलीत मारामारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2018 04:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading