Home /News /news /

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे इथं झालेल्या पक्षाच्या प्रदेश कार्यकारणी बैठक हा निर्णय घेण्यात आला.

पुणे,29 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे इथं झालेल्या पक्षाच्या प्रदेश कार्यकारणी बैठक हा निर्णय घेण्यात आला. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. सुनील तटकरे यांनी शुक्रवारी प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त होण्याची भाषा केली होती. त्यानंतर तटकरे यांना राष्ट्रीय महासचिव पदावर तात्काळ नियुक्ती केली. त्यामुळं तटकरे यांच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्ष नियुक्त होणारं हे निश्चित झालं होतं. जयंत पाटील हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्याचवेळी मवाळ चेहरा, अभ्यासू प्रतिमा, सहकार क्षेत्रात काम हे जमेची बाजू आहे. जयंत पाटील यांनी अर्थ खाते, गृह खाते, ग्रामविकास खात्याचा कारभार पाहिला आहे. पाटील यांच्या सोबतच शशिकांत शिंदे यांचेही नाव चर्चेत होतं.
First published:

Tags: Jayant patil, Maharashtra, NCP, State president, जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी, शरद पवार

पुढील बातम्या