जावेद अख्तर यांनी इमरान खान यांना दिलं सडेतोड उत्तर म्हणाले, ‘पुन्हा नो बॉल टाकला...’

इमरान त्यांच्या वक्तव्यात प्रत्येकवेळी ते एकच सवाल करार होते की हा हल्ला पाकिस्तानने केलं हे भारताला कसं माहीत.

News18 Lokmat | Updated On: Feb 20, 2019 11:17 AM IST

जावेद अख्तर यांनी इमरान खान यांना दिलं सडेतोड उत्तर म्हणाले, ‘पुन्हा नो बॉल टाकला...’

मुंबई, २० फेब्रुवारी २०१९- जम्मू- काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांना वीरमरण आलं. या भ्याड हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तान आणि त्याच्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीला विरोध केला जात आहे. यात सिनेसृष्टीही मागे नाही. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान, कैलाश खेर आणि मुकेश अंबानी यांनी शहीद जवानांच्या कुटुंबाला कोट्यवधी रुपयांची मदत केली. तसेच पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्यासही मनाई केली.

भारतीयांचा पाकिस्तानासाठी असलेला क्रोध पाहून पंतप्रधान इमरान खान यांनी दिलेल्या विधानात स्पष्ट म्हटलं की, ‘या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा पुरावा दाखवा. दोषींना लवकरात लवकर शिक्षा दिली जाईल.’ खान यांच्या या वक्तव्यावर ट्विट करत जावेद अख्तर म्हणाले की, ‘इमरान खान यांनी पुन्हा एकदा नो बॉल फेकला आहे.’इमरान त्यांच्या वक्तव्यात प्रत्येकवेळी ते एकच सवाल करार होते की हा हल्ला पाकिस्तानने केलं हे भारताला कसं माहीत. जावेद यांनी पुढे लिहिलं की, ‘जेव्हा मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता तेव्हा एका पाकिस्तानी पत्रकाराने मला विचारलं होतं की, ‘तुम्ही म्हणू शकता की हा हल्ला पाकिस्तानने केला, पण असे हल्ले कोणताही देश करू शकतो. यावर मी त्यांना तीन पर्याय दिले. पहिला- ब्राझील, दुसरा- स्वीडन आणि तिसरा- पाकिस्तान.’

Loading...जावेद अख्तर यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी शबाना आझमी आणि जावेद अख्तर पाकिस्तानातील कराची येथे होणाऱ्य एका सांस्कृतिक कार्यक्रमाला हजर राहणार होते. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर दोघांनीही पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता.

SPECIAL REPORT : 'शरण या, अन्यथा मरणाला तयार राहा'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2019 11:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...