बुमराहने घेतली Corona Vaccine, इंग्लंडला जाण्याआधी लस घेणारा पाचवा खेळाडू

बुमराहने घेतली Corona Vaccine, इंग्लंडला जाण्याआधी लस घेणारा पाचवा खेळाडू

टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) कोरोना लशीचा (Corona Vaccine) पहिला डोस घेतला आहे. याचसोबत इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या 5 खेळाडूंची आतापर्यंत कोरोनाची पहिली लस घेऊन झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 11 मे : टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) कोरोना लशीचा (Corona Vaccine) पहिला डोस घेतला आहे. याचसोबत इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या 5 खेळाडूंची आतापर्यंत कोरोनाची पहिली लस घेऊन झाली आहे. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), उमेश यादव (Umesh Yadav), इशांत शर्मा (Ishant Sharma) यांचा समावेश आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. 18 जूनपासून या मॅचला सुरुवात होईल, यानंतर भारतीय टीम इंग्लंडविरुद्ध (India vs England) 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळेल.

जसप्रीत बुमराहने लस घेतल्यानंतरचा आपला फोटो सोशल मीडियावर शेयर केला. मी कोरोनाची लस घेतली, प्रत्येक जण सुरक्षित राहा, असं कॅप्शन बुमराहने या फोटोला दिलं. एक दिवसआधीच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेही मुंबईत कोरोनाची लस घेतली. विराटनंही सोशल मीडियावर त्याचा फोटो शेयर करत, सगळ्यांनी लस अवश्य घ्या, असं आवाहन केलं होतं.

इशांत शर्मानेही एक दिवस आधीच पत्नी प्रतिमा सिंगसोबत कोरोना लस घेतली. 'सगळ्या फ्रन्टलाईन वर्कर्सचे धन्यवाद, कोरोना लशीच्या केंद्रावरचे कर्मचाऱ्यांचं काम बघून समाधानी आहे. तुम्हीही कोरोना लस घ्या,' असं इशांत शर्मा म्हणाला. तर अजिंक्य रहाणेनेही तीन दिवसांपूर्वी पत्नी राधिकासोबत मुंबईत कोरोनाचा पहिला डोस घेतला. तर शिखर धवन हा लस घेणारा पहिला क्रिकेटपटू होता.

बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंना कोविशिल्डचा पहिला डोस घ्यायला सांगितलं होतं, कारण बोर्ड दुसऱ्या डोसची व्यवस्था इंग्लंडमध्ये करणार आहे. यासाठी बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड यांच्यात चर्चाही झाली आहे. कोविशिल्ड ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाची असल्यामुळे खेळाडूंना ही लस इंग्लंडमध्ये सहज उपलब्ध होईल.

Published by: Shreyas
First published: May 11, 2021, 4:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या