Home /News /news /

Modern Solution: सायकल चोरी होऊ नये म्हणून जपानी व्यक्तीने लढवली 'ही' नामी शक्कल

Modern Solution: सायकल चोरी होऊ नये म्हणून जपानी व्यक्तीने लढवली 'ही' नामी शक्कल

अनेकदा व्यक्ती आपल्याला प्रिय असलेली वस्तू जपण्यासाठी काहीही करू शकतो.

    टोकियो, 11 सप्टेंबर : अनेकदा व्यक्ती आपल्याला प्रिय असलेली वस्तू जपण्यासाठी काहीही करू शकतो. ती वस्तू हरवू नये किंवा तिची कुणी चोरी करू नये यासाठी काहीतरी करून ती वस्तू जपत असतात. आपल्या प्राणापेक्षा प्रिय कधीकधी आपली वस्तू लोकांना वाटू लागते. जपानमध्ये देखील एका व्यक्तीने अशाच प्रकारे आपली वस्तू जपण्यासाठी खटाटोप केला आहे. येथील व्यक्तीने आपली सायकल चोरी न होण्यासाठी एक वेगळीच शक्कल लढवली असून पक्षाच्या विष्टेचे स्टिकर आपल्या सायकलच्या सीटवर लावले आहे. युनिलॅड या स्थानिक वृत्तसंस्थेत आलेल्या वृत्तानुसार, जपानमधील मोटोकी रोगा या 29 वर्षीय व्यक्तीने आपली सायकल चोरिला जाऊ नये यासाठी हि शक्कल लढवली आहे. सायकल च्या सीटवर पक्षाची विष्टा असल्याने त्याची सायकल चोरी होणार नाही याचा त्याला विश्वास असल्याने त्याने हि शक्कल लढवल्याचे सांगितले. हे स्टिकर त्याच्या अभ्यासाचा भाग होते. त्यामुळे त्याच्या डोक्यात हि आयडिया आली. यासाठी त्याने काही प्रयोग देखील केले होते. त्याने अनेक मोटारसायकलवर अशा पद्दतीने स्टिकर लावले होते. त्यानंतर पाच दिवसांनी त्याने जाऊन पहिले असता यामधील कोणतीही गाडी चोरीला गेली नव्हती. त्यामुळे त्याने आपल्या सायकलच्या सीटवर देखील असे स्टिकर लावण्याचा निर्णय घेतला. हे वाचा-बैरूदसारख्या स्फोटानं हादरलं जॉर्डन, आकाशात दिसले आगीचे गोळे, पाहा VIDEO मात्र महत्वाचे म्हणजे त्याने या सामाजिक प्रयोगासाठी नागरिकांच्या माध्यमातून नोंदही देखील उभा केलं आहे. त्याने 200,000 जपानी येन उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र त्याला लोकांनी भरभरून पाठिंबा दिल्याने 450,000 जपानी येन इतकी रक्कम उभी राहिली आहे. याविषयी व्यक्त करताना त्याने म्हटले कि, सगळ्यांचे धन्यवाद. सर्व रक्कम व्यवस्थित जमा झाली असून तुमच्या सहकार्यामुळे या सामाजिक कार्याला मोठा आधार मिळाला आहे. जपानमध्ये मोठ्या प्रमाणात सायकल चोरी होत असतात. प्रत्येक 15 व्या मिनिटाला जपानमध्ये सायकल चोरी होत असतात. 2018 मध्ये जपानमध्ये 35,395 सायकल चोरीला गेल्या होत्या. यापैकी 42 टक्के सायकल व्यवस्थित लॉक केलेल्या होत्या. मात्र तरीदेखील त्या चोरी झाल्या.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या