पाहा PHOTO : एका इसमाने अ‍ॅनिमेशन स्टुडिओमध्ये घुसून लावली आग, 26 जणांचा मृत्यू

जपानमधल्या एका अ‍ॅनिमेशन स्टुडिओमध्ये भीषण आग लागली. एका इसमाने स्टुडिओमध्ये घुसून ही आग लावली. आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

  • Share this:

 जपानमधल्या क्योटो शहरात एका अॅनिमेशन स्टुडिओला आग लागली. एका अज्ञात इसमाने या स्टुडिओमध्ये घुसून आग लावली, असं बोललं जातं.

या स्टुडिओला आग लागली तेव्हा तिथे 70 जण होते, असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

जपान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार सकाळी साडेदहाच्या सुमाराला ही आग लागली.

ज्या इसमाने आत घुसून ही आग लावली त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

क्योटोमध्ये ही तीनमजली इमारत आहे. या इमारतीत स्फोट झाल्यासारखे आवाज आले, असं शेजारचे लोक सांगतात.

इमारतीतून सतत धूर येत होता. लोकांना घोंगडीमध्ये घालून बाहेर आणावं लागत होतं.

या आगीने 26 जणांचा जीव घेतला असून 35 पेक्षा जास्त जण गंभीर जखमी आहेत.

ही आग एवढी मोठी होती की अग्निशमन दलाच्या 35 गाड्या तिथे पाठवाव्या लागल्या.

आगीनंतरचं बचावकार्य अनेक तास सुरू होतं. स्टुडिओमध्ये अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढणं हे अत्यंत जोखमीचं काम होतं.

अॅनिमेशन स्टुडिओमध्ये एका व्यक्तीने काही द्रव्यपदार्थ शिंपडले आणि त्यामुळे ही लागली.

अॅनिमेशन स्टुडिओमध्ये एका व्यक्तीने काही द्रव्यपदार्थ शिंपडले आणि त्यामुळे ही आग लागली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2019 05:20 PM IST

ताज्या बातम्या