जमशेदपूरमध्ये मुलं चोरण्याच्या अफवेमुळे जमावाने 8 जणांना ठार मारलं

जमशेदपूरमध्ये मुलं चोरण्याच्या अफवेमुळे जमावाने 8 जणांना ठार मारलं

या अफवेमुळे संशयाच्या आधारावर गेल्या नऊ दिवसांत आठ जणांना जमावाने मारहाण करून ठार मारलंय.

  • Share this:

19 मे : जमशेदपूरध्ये मुलं चोरी झाल्याच्या अफवेला सोशल मीडियावर पेव फुटलाय. याहुन धक्कादायक म्हणजे या अफवेमुळे संशयाच्या आधारावर गेल्या नऊ दिवसांत आठ जणांना जमावाने मारहाण करून ठार मारलंय.

गेल्या आठवड्याभरापासून जमशदेपूरमध्ये मुलं चोरी होत असल्याची अफवा पसरलीये. जमशेदपूरचे एसएसपी अनूप टी मॅथ्यू यांनी सांगितलं की, या अफवेमुळे नऊ दिवसांमध्ये आठ जणांचा मृत्यू झालाय. आम्ही या प्रकरणी कडक पावलं उचलली असून अफवा पसरवणाऱ्यावर कडक कारवाई करणार आहोत.

तर जमशेदपूरचे शहर पोलीस अधिक्षक प्रशांत आनंद यांनी ही या घटनेला दुजोरा दिलाय. मुलं चोरी होण्याची अफवा व्हाॅटस्अॅप आणि फेसबुकवर शेअर होत आहे.

काय आहे हे प्रकरण ?

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओमध्ये लहान मुलांचे प्रेत दाखवण्यात आले असून या मुलांच्या शरीराचे अवयव गायब आहे. तुम्हाला जर मुलं चोरणारे कुठे दिसले तर ताबडतोब पोलिसांना माहिती द्या असा संदेशही यात देण्यात आलाय.

जमशेदपूरसह नजीकच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय. या मॅसेजचे अनेक जण बळी पडले आहे.

मात्र, या अशी कोणतीही तक्रार आमच्याकडे आली नाही असं जमशेदपूरचे एसएसपी अनूप टी मॅथ्यू यांनी सांगितलंय. तसंच अफवांवर विश्वास ठेऊ नका असं आवाहनही त्यांनी केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2017 07:22 PM IST

ताज्या बातम्या