VIDEO : पुन्हा पुलवामा होण्याचं थोडक्यात टळलं, गाडीत ठेवलेल IED डिफ्यूज करण्यात यश

VIDEO : पुन्हा पुलवामा होण्याचं थोडक्यात टळलं, गाडीत ठेवलेल IED डिफ्यूज करण्यात यश

  • Share this:

जम्मू-काश्मीर, 28 मे : काश्मीरमध्ये पुन्हा एकदा हिजबुलचा मोठा कट उधळून लावण्यात सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती थोडक्यात टळली आहे. पुन्हा एकदा गाडीमध्ये IED स्फोटकं भरून हिजबुलचा दहशतवादी कार चालवत असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. सायकलचा नंबर लावून सेन्ट्रो कार या हल्ल्यासाठी वापरण्यात आल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलानं हा कट उधळून लावला आहे. सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे पुन्हा एकदा मोठा घातपात थोडक्यासाठी टळला आहे.

पुलवामा पोलीस, सीआरपीएफ आणि सुरक्षा दल यांनी एकत्र येऊन कारवाई केली. या गाडीमध्ये IED स्फोटकं होती. या स्फोटकांची विल्हेवाट लावण्यात जवानांना यश आलं आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी ही गाडी चालवत असल्याचं सांगितलं जात आहे.

सुरुवातील गाडीतून जवानांवर तुफान गोळीबार करण्यात आला. मात्र काहीवेळानंतर हा दहशतवादी गाडी सोडून फरार झाला. या प्रकरणाची चौकशी NIA करणार आहे. पुलवामामधील राजपुरा रोडजवळ शादिपुरा इथे ही गाडी पकडण्यात आली.

हिजबुल आणि लष्कर ए तोएबा दोघांचा मिळून मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट असल्याची माहिती सुरक्षा दलाला रविवारी मिळाली होती. त्यामुळे पोलीस, सीआरपीएफ आणि सुरक्षा दल सतर्क होते. हे फोटो पाहून केवढ्या मोठ्या हल्ल्याचा कट असेल याची कल्पना आपल्याला येऊ शकते. संपूर्ण कार जळून खाक झाली आहे. परिसरात असलेल्या एका घराचंही मोठं नुकसान झालं आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 28, 2020, 9:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading