Home /News /news /

श्रीनगर चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, 2 हल्लेखोरांचा खात्मा तर एक जवान शहीद

श्रीनगर चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, 2 हल्लेखोरांचा खात्मा तर एक जवान शहीद

JAMMU, INDIA - OCTOBER 10: Indian army soldiers take position near the Line of Control on October 10, 2016 in Nowshera sector, about 145 km from Jammu, India. (Photo by Nitin Kanotra/Hindustan Times via Getty Images)

श्रीनगरच्या लावेपोरा परिसराच्या पोरेम पोरा चेक पोस्टवर अचानक गोळीबाराचा आवाज ऐकू आला. त्यानंतर लवकरच सीआरपीएफच्या जवानांनी मोर्चा ताब्यात घेतला.

    श्रीनगर, 05 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) श्रीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. येथील परिमपोरा भागातील दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये मोठी चकमक झाली आहे. या चकमकीत एक सीआरपीएफ जवान शहीद झाला आहे. त्याच वेळी, दहशतवाद्यांच्या कारवाईला उत्तर देताना भारतीय सैनिकांनी 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरच्या लावेपोरा परिसराच्या पोरेम पोरा चेक पोस्टवर अचानक गोळीबाराचा आवाज ऐकू आला. त्यानंतर लवकरच सीआरपीएफच्या जवानांनी मोर्चा ताब्यात घेतला. या भागात आणखी काही दहशतवादी लपून बसू शकतात असे सांगितले जात आहे. सीआरपीएफ जवळपास शोध मोहिम सुरू आहे. सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याला जिवंत पकडले असून तो जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर अद्यापही चकमक सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Jammu kashmir

    पुढील बातम्या