सावधान ! पबजी गेम खेळता-खेळता 19 वर्षीय मुलाचा झाला मृत्यू

सावधान ! पबजी गेम खेळता-खेळता 19 वर्षीय मुलाचा झाला मृत्यू

पबजी गेमच्या वेडापायी अनेकांचे जीव धोक्यात आल्याच्या घटनाही वारंवार घडत आहेत. नुकतंच या गेममुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:

श्रीनगर, 27 जुलै : ऑनलाइन व्हिडीओ गेम पबजीनं तरुणाईला अक्षरशः वेड लावलं आहे. या गेमच्या वेडापायी अनेकांचे जीव धोक्यात आल्याच्या घटनाही वारंवार घडत आहेत. नुकतंच या गेममुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पबजी खेळत असताना 19 वर्षीय असीम बशीरचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, असीम गुरुवारी (25 जुलै)आपल्या मित्राच्या घरी गेला होता. मित्राचे कुटुंबीय सकाळच्या नाश्त्यासाठी त्याची प्रतीक्षा करत होते. पण 25 आणि 26 जुलैच्या रात्री तो पबजी खेळताना बेशुद्ध झाल्याची कथित माहिती समोर आली. यानंतर तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जम्मू काश्मीरच्या श्रीनगर येथील ही धक्कदायक घटना आहे. पोलिसी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पबजीमुळे एका तरुणाचा मृत्यू होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. पण देशभरात अशा कित्येक घटना घडल्या आहेत.

(पाहा : महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या बचावकार्यासाठी 2 हेलिकॉप्टर्स)

गेम खेळताना युवकाचा हृदयविकारानं मृत्यू

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील नीमच येथेही या गेमनं एका तरुणाचा बळी घेतला होता. सलग 6 तास पबजी गेम खेळणाऱ्या फुरकान कुरेशी नावाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला.

pubg

(पाहा :महालक्ष्मी एक्स्प्रेसला चहूबाजुंनी पाण्याचा वेढा, पाहा LIVE VIDEO)

मानदुखीमुळे युवकाचा मृत्यू

26 मार्च 2019 रोजी तेलंगणातील एका 20 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. सलग 45 दिवस तो पबजी खेळत होता, यामुळे त्याला मानदुखीचा त्रास होऊ लागला. वेदना असह्य झाल्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

ऑनलाइन खेळ पबजीने लोकांना इतकं वेड लावलय की त्या खेळाच्या नशेत लोक काय-काय करतील हे सागंता येत नाही. अनेक लोकांना त्यातल्या त्यात किशोरवयीन मुलांना व युवकांना तो खेळ खेळताना आपण एक सैनिकच आहे असाच भास होतो.

(वाचा  : दररोज दर 5 पैकी 1 भारतीय उदासीनतेसह जगतो, जाणून घ्या काय आहे कारण)

रागाच्या भरात मुलानं केली आत्महत्या

तर दुसरीकडे मुंबईतील एका 18 वर्षांच्या युवकानं पबजी खेळण्यासाठी कुटुंबीयांकडे महागड्या मोबाइल फोनची मागणी केली. पण घरातल्यांनी नकार दिल्यानंतर त्यानं रागाच्या भरात आत्महत्या केली. दरम्यान, पबजीमुळे वाढणाऱ्या आत्महत्यांच्या घटना पाहता अनेक राज्यांमध्ये या गेमवर बंदी आणली गेली आहे. पंजाब, गुजरातसह कित्येक राज्यांमध्ये हा गेम बॅन करण्यात आला आहे.

'त्या' 7 प्रवाशांच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार, पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2019 01:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading