Home /News /news /

जम्मू-कश्मीरच्या कुलगामध्ये चकमक, सुरक्षा दलाने 1 दहशतवाद्याला केलं ठार

जम्मू-कश्मीरच्या कुलगामध्ये चकमक, सुरक्षा दलाने 1 दहशतवाद्याला केलं ठार

सुरक्षा दल परिसरात शोध घेत असताना एक दहशतवादी लपून बसला असल्याची माहिती त्यांच्या हाती आली आणि तोच दहशवाद्याने त्यांच्यावर गोळीबार सुरू केला.

    श्रीनगर, 20 जून : जम्मू काश्मीरच्या (Jammu-Kashmir) कुलगाम जिल्ह्यामध्ये शनिवारी सुरक्षा दलासोबत (Security forces) झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. सुरक्षा दल परिसरात शोध घेत असताना एक दहशतवादी लपून बसला असल्याची माहिती त्यांच्या हाती आली आणि तोच दहशवाद्याने त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलानेही कारवाई करत ताबडतोब उत्तर दिलं. यामध्ये झालेल्या गोळीबार एक दहशतवादी ठार झाला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्याची अद्याप ओळख पटलेली नसून सध्या भागात लष्कराची शोध मोहीम सुरू आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कुलगामच्या लिखदीपुरा क्षेत्रात दहशतवादी लपले असल्याची गोपनीय माहिती हाती लागली होती. ज्यानंतर सुरक्षा दलांने संबंधित परिसरात शोधमोहिम सुरू केली. ज्यावेळी सुरक्षा दल या परिसरात तपास करत होतं त्यावेळी अचानक मागून गोळीबार झाला. यामध्ये झालेल्या चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. पंपोर आणि शोपियानमध्ये 7 दहशतवादी ठार यापूर्वी गुरुवारी सकाळी जम्मू-काश्मीरमधील पामपोर आणि शोपियान इथे भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 7 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. हे दहशतवादी अवंतीपोरा इथल्या मेज पंपोर इथे चकमकीच्या भीतीने मशिदीत लपले होती अशी माहिती समोर येत आहे. यावेळी मोठी चकमक झाली आणि गोळीबारात शोपियांमध्ये 5 आणि पंपोरमध्ये 3 दहशतवादी ठार झाले. 14 दिवसांत ठार झाले 25 दहशतवादी मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील सुगो हेंधामा इथं बुधवारी भारतीय लष्कराच्या चकमकीत 4 दहशतवादी ठार केले गेले. इथे अजूनही सुरक्षा दलांकडून शोधमोहीम सुरू आहे. या भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. माहितीच्या आधारे सैन्य, पोलीस आणि सीआरपीएफची संयुक्त टीम तयार केली गेली. सैनिकांनी परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली. आपण पकडले जाऊ या भीतीने घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सैन्यावर गोळीबार सुरू केला. पण चारही बाजूंनी सैनिकांनी गोळीबार करत 4 दहशतवादी ठार केले. गेल्या 14 दिवसांत 25 दहशतवादी ठार झाले आहेत. तर यावर्षी सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये सुमारे 100 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. संपादन - रेणुका धायबर
    First published:

    Tags: Kashmir terrorist attack

    पुढील बातम्या