Home /News /news /

'इतिहासात पहिल्यांदाच 4 महिन्यांत 4 दहशतवादी संघटनांचे चीफ मारले गेले'

'इतिहासात पहिल्यांदाच 4 महिन्यांत 4 दहशतवादी संघटनांचे चीफ मारले गेले'

'यावर्षी भारतीय सैन्याने 106 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये शांती ठवणं हेच आमचं ध्येय आहे.'

    श्रीनगर, 21 जून : जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) भारतीय लष्कर (Indian Army) आणि पोलीस दहशवाद्यांचा (Terrorist) खात्मा करण्यात व्यस्त आहे. रविवारी श्रीनगरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. यात 3 अतिरेकी ठार झाले. या सर्व प्रकरणाची माहिती आयजी काश्मीर झोनच्या विजय कुमार यांनी दिली आहे. ते म्हणाले की, 'या कामगिरीमुळे मी सुरक्षा दलाचं अभिनंदन करतो कारण इतिहासात पहिल्यांदाच दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांना भारतीय सैन्याने 4 महिन्यांत संपवलं आहे. त्यामध्ये लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन आणि अंसार गजवत-उल हिंद या प्रमुखांचा समावेश होता.' ते पुढे म्हणाले की, 'यावर्षी भारतीय सैन्याने 106 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये शांती ठवणं हेच आमचं ध्येय आहे. त्यामुळे सुरक्षा दलामध्ये सतत ऑपरेशन सुरू आहे आणि हे पुढे चालतच राहणार' आयईडी एक्सपर्टलाच केलं ठार कुलगाम इथे शनिवारी झालेल्या हल्ल्यात एका दहशतवाद्याची हत्या करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे. तर यावेळी दोन दहशतवादी शस्त्रास्त्र सोडून पळून गेले होते. त्यात ठार झालेला पाकिस्तानी दहशतवादी असून तोआयईडी एक्सपर्ट असल्याचं सांगितलं जात आहे. तर आज ठार झालेल्या दहशतवाद्याकडूनही एम -4 आणि एके 47 रायफल जप्त करण्यात आली आहे. विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरमध्ये काही दहशतवादी घरात लपून बसले असल्याची माहिती हाती लागली होती. त्यानंतर पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी संपूर्ण परिसर घेरला आणि स्वत:ला पोलिसांच्या स्वाधिन करा अशा सूचना दिल्या. तरीही दहशतवादी बाहेर आले नाही. त्यामुळे सैनिकांनी कारवाई करत गोळीबार केला आणि तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. रविवारी श्रीनगरमध्ये झालेल्या एन्काऊंटरमध्ये 3 दहशतवाद्यांमधील 2 दोघांची ओळख पटली आहे तर एक दहशतवाद्याचा तपास सुरू आहे. दहशतवाद्यांशी झालेल्या या चकमकीमध्ये सुरक्षा दलालात कोणतंही नुकसान झालं नसल्याची माहितीही वियज कुमार यांनी दिली आहे. संपादन - रेणुका धायबर
    First published:

    Tags: 4 terrorists killed, Jammu kashimir

    पुढील बातम्या