Breaking: पुलवामातील 'जमात-ए-इस्लामी'चं कार्यालय सील, अजूनही चकमक सुरूच

Breaking: पुलवामातील 'जमात-ए-इस्लामी'चं कार्यालय सील, अजूनही चकमक सुरूच

पुंछमध्ये झालेल्या गोळीबारात मोहम्मद युनूस जखमी झाले तर त्यांची पत्नी रबीना कौसर (32) फजान (5), आणि मुलगी शबनम (9 महिने) यांचा मृत्यू झाला. मोहम्मद युनूस यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

  • Share this:


जम्मू-कश्मीर, 02 मार्च : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये जिल्हा रुग्णालयाजवळ असलेल्या जमात ए इस्लामीच्या कार्यालयाला पोलिसांकडून सील करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव अजूनही निवळलेला नाही. सीमारेषेलगत असलेल्या राजौरी आणि पुंछ भागात मोठ्या प्रमाणात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. पुंछमध्ये झालेल्या गोळीबारात मोहम्मद युनूस जखमी झाले तर त्यांची पत्नी रबीना कौसर (32) फजान (5), आणि मुलगी शबनम (9 महिने) यांचा मृत्यू झाला. मोहम्मद युनूस यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या गोळीबारात पाकने मोठ्या शस्त्रांचाही वापर केला असल्याचं कळतं आहे.

पाकिस्तानातून जम्मूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वारंवार गोळीबार करण्यात येत आहे. दरम्यान, जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यामध्ये हंदवाडात बाबागुड लंगेट परिसरात शुक्रवारी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये 4 सीमा सुरक्षारक्षक शहीद झाले तर या हल्ल्यात 8 पेक्षा जास्त जवान जखमी झाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफ आणि लष्कराचे जवान हे दहशतवाद्यांचे शव आणण्यासाठी गेले होते. यामध्ये 2 दहशतवाद्यांचे मृतदेह होते. भारतीय जवान तिथे पोहचताच मृतदेहांपैकी एक दहशतवादी अचानक उठला आणि त्याने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारामध्ये 4 भारतीय जवान शहीद झाले आहेत तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे.


सध्या सुरक्षादलांमध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू आहे. अभिनंदन भारतात परतत असतानाच पकिस्तानने शुक्रवारी पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने ही आगळीक केली. भारतानेही पाकिस्तानच्या या कुरापतीला चौख प्रत्युत्तर दिलं.

Loading...

शांततेच्या गप्पा मारत असतानाच सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. सायंकाळी नौशेरा भागात पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं. गेल्या गेल्या आठ दिवसांपासून भारतीय चौक्यांवर गोळीबार करत असून दोन दिवसांमध्ये पाकिस्तानने 36 पेक्षा जास्त वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.

व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी पाकिस्तानने अभिनंदन यांना थांबवून ठेवलं!

भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान हे अखेर भारतात परतले आहेत. गेल्या 2 दिवसांपासून संपूर्ण देश त्यांच्या या रिअल हिरोची वाट पाहत होता. अखेर शुक्रवारी रात्री 9:15 मिनिटांनी अभिनंदन यांनी पाकिस्तानची सीमा पार करत भारतात प्रवेश केला. याआधी कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचं कारण देत पाकिस्तानने अभिनंदन यांचा भारतातला प्रवेश लांबवला. पण याचं खरं कारण वेगळंच आहे.

अभिनंदन यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करून घेण्यासाठी त्यांना इतक्या वेळ थांबून घेतलं असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. याआधीही अभिनंदन यांना पाकिस्तानकडून ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. त्यांना मारहाण करतानाचे, त्याचबरोबर त्यांना पाकिस्तानी लष्कराकडून प्रश्न विचारण्यात आल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. असाच व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी पाकने अभिनंदन यांचा भारतातला प्रवेश लांबवला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

वाघा बॉर्डरवर विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारताच्या ताब्यात सोपवलं. यावेळी सगळ्यात आधी 'आता छान वाटतं आहे' असं अभिनंदन म्हणाले. अभिनंदन यांच्या मायदेशी परतल्याने जो आनंद अवघ्या देशाला झाला होता तोच आनंद आणि आपल्या देशाप्रती असलेला अभिमान हा या ढाण्या वाघाच्या डोळ्यांत दिसत होता.

बॉर्डवर भारताकडे आल्यानंतर सगळ्यात आधी अभिनंदन यांना अमृतसरहून दिल्लीला आणण्यात आलं. त्यांना वायुदलाच्या विमानाने पालम एअरपोर्टवर आणण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना दिल्लीच्या आरआर रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं आहे तर शनिवारी भारतीय लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अभिनंदन यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.


VIDEO : पाककडून सीमेवर गोळीबार, 9 महिन्याच्या चिमुकलीसह आई आणि भावाचा मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2019 09:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...