जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या 5 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या 5 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा डाव भारतीय लष्कराने उधळवून लावला. घुसखोरी करणाऱ्या 5 दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने खात्मा केलाय.

  • Share this:

09 जून : जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा डाव भारतीय लष्कराने उधळवून लावला. घुसखोरी करणाऱ्या 5 दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने खात्मा केलाय. अजूनही हे आॅपरेशन सुरू आहे.

उरी सेक्टरमध्ये सीमारेषेवर आज दुपारी दहशतवाद्यांनी पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न केला. पण तिथे तैनात असलेल्या लष्कराने जोरदार हल्ला चढवत दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला.

गेल्या 24 तासांपासून या भागात घुसखोरीचा प्रयत्न सुरू होता. याआधीही मागील गुरुवारी नौगामा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं होतं. पण, या चकमकीत भारतीय सैन्याचा एक जवान शहीद झाला.

भारतीय लष्कराने बुधवारी माछिल सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या

4 दहशतवाद्यांना ठार मारलं होतं. जम्मू-काश्मीरमध्ये सीमारेषेजवळ गेल्या वर्षभरात आतापर्यंत 23 वेळा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आणि 40 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

First Published: Jun 9, 2017 07:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading