जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये बस दरीत कोसळली,11 प्रवाशांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये बस दरीत कोसळली,11 प्रवाशांचा मृत्यू

मंडी इथं जाणारी ही बस शेकडो फूट खोल दरीत कोसळली.

  • Share this:

जम्मू-काश्मीर, 08 डिसेंबर : पुंछ सेक्टरमध्ये शनिवारी सकाळी एक बस दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मंडी इथं जाणारी ही बस शेकडो फूट खोल दरीत कोसळली.

एनआयए या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली ही बस मंडी इथं जात होती. बसचालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 34 जण गंभीर जखमी आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळाल्यानुसार घटनास्थळी पोलीस आणि रुग्णवाहिका पोहोचल्या.जखमींना मंडी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुंछचे डीडीसीने या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाल्याचा बातमीला दुजोरा दिला आहे. या अपघातात गंभीर जखमींना एअर अॅम्ब्युलन्सने रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

स्थानिक वृत्तांनी दिलेल्या माहितीनुसार,JK-02-W-0445 ही बस लूरन येथून पुंछला जात होती. घाटात आल्यानंतर बसचालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले त्यामुळे बस दरीत कोसळली.

हा अपघात का आणि कसा घटला याचा पोलीस अधिक तपास करत आहे.

========================================

First published: December 8, 2018, 2:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading