जम्मू-काश्मीर: पुलवामाच्या त्रालमध्ये चकमक, सुरक्षादलाने 3 दहशतवाद्यांना केलं ठार

जम्मू-काश्मीर: पुलवामाच्या त्रालमध्ये चकमक, सुरक्षादलाने 3 दहशतवाद्यांना केलं ठार

दहशतवादी (Terrorist) ज्या भागात लपून बसले होते तो भागात सुरक्षा दलाने संपूर्ण घेरला होता. त्यानंतर सुरक्षा दलाने यामध्ये 3 दहशतवाद्यांना ठार केलं.

  • Share this:

श्रीनगर, 19 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorist) मंगळवारी रात्री उशिरा चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. यावेळी बराच वेळ गोळीबार सुरू होता. दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रं होती त्यामुळे ते सतत गोळीबार करत राहिले.

दहशतवादी (Terrorist)  ज्या भागात लपून बसले होते तो भागात सुरक्षा दलाने संपूर्ण घेरला होता. त्यानंतर सुरक्षा दलाने यामध्ये 3 दहशतवाद्यांना ठार केलं. अजूनही परिसरात शोध मोहीम राबविली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर याच परिसरात आणखी काही अतिरेकी लपून बसले असल्याची शंका सुरक्षा दलाला आहे.

ठार केलेल्या 3 दहशतवाद्यांपैकी दोघांनी यापूर्वी 5 फेब्रुवारी रोजी श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या (CRPF) वाहनावर हल्ला केला होता. त्यानंतर झालेल्या चकमकीत (Terrorist Encounter) सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना

ठार केलं. या चकमकीत जखमी झालेल्या दहशतवाद्याचा नंतर मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर चकमकीत सीआरपीएफचा एक जवानही शहीद झाला आहे. शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानचे नाव जीडी रमेश रंजन आहे. ते बिहारच्या आरा जिल्ह्यातील होते.

सीआरपीएफ-पोलीस पक्षावर केला होता हल्ला

श्रीनगरमधील परिम चौकीजवळ हा हल्ला झाला. बुधवारी श्रीनगर बारामुल्ला रोडवरील दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि पोलीस पक्षावर हल्ला केला. श्रीनगरच्या लावेपोरा भागातील परिम पोरा चेक पोस्टवर अचानक गोळीबाराचा आवाज ऐकू आला. त्यानंतर तात्काळ सावध होत सीआरपीएफच्या जवानांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2020 06:54 AM IST

ताज्या बातम्या