काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मुंबईकर मेजर केपी राणे शहीद

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2018 05:48 PM IST

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मुंबईकर मेजर केपी राणे शहीद

मुंबई, 07 आॅगस्ट : उत्तर काश्मीरमधल्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत चार जणांना वीरमरण आलंय. यामध्ये मुंबईचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रसाद राणे शहीद झाले आहेत. मेजर केपी राणे हे मुंबईजवळील मीरारोड येथील रहिवासी होते. मेजर कौस्तुभ राणे मिरारोडच्या शीतल नगरमध्ये हिरल  इमारतमध्ये आपल्या कुटुंब बरोबर राहत होते. सहा र्षी पूर्वी राणे सैन्यात दाखल झाले.त्यांच्या पश्चात आई, वडील, लहान ,बहीण, पत्नी आणि दोन वर्षांचा लहान मुलगा असा परिवार आहे.

उत्तर काश्मीरमधल्या गुरेज सेक्टरमध्ये लष्कराचे एक मेजर आणि 3 जवान शहीद झाले. दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत या 4 जणांना वीरमरण आलं आहे. या चकमकीत एकूण 8 दहशतवादी होते. त्यातल्या 4 दहशतवाद्यांना आपल्या जवानांनी कंठस्नान घातलंय. या परिसरात चकमक अजूनही सुरू आहे. गुरेज हे एलओसीजवळ आहे. श्रीनगरपासून 123 किलोमीटरवर गुरेज सेक्टर आहे. मंगळवारी रात्री लष्कराचा एलओसीवर संशयित हालचाली दिसल्या. त्यानंतर गोळीबार सुरू झाला. लौसर, सरदारी, नुशेरानर आणि दुरमत या पाकव्याप्त काश्मीरमधल्या गावांमधून दहशतवादी आपल्या हद्दीत घुसले.

मेजर केपी राणे, हवलदार जामी सिंग, हवलदार विक्रमजीत, रायफल मॅन मनदिप अशी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची नावं आहेत. केपी राणे हे मुंबईतील रहिवासी आहे. मीरारोड इथं ते राहत होते. ही चकमक अजूनही सुरू आहे. त्यामुळे आता भारतील सैन्य याचा बदला घेण्याच्या पवित्र्यात कारवाई करत आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, सोमवारपासून पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर वारंवार गोळीबार सुरू होता. यावेळी, सीमावर्ती भागात भारतातील 8 दहशतवादी घुसखोरी करताना आढळले आहे. जेव्हा भारतीय सैनिकांनी त्यांच्यावर गोळीबार केला, तेव्हा त्यांनीही गोळीबार करण्यास सुरूवात केली. या हल्ल्यात चार भारतीय जवान शहीद झाले आहेत.

या ऑपरेशनमध्ये लष्कराच्या 36 राष्ट्रीय रायफल्स आणि  9 ग्रेनेडियर्स यांनी दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. लष्करी माहिती नुसार, अजूनही अनेक दहशतवादी या क्षेत्रात लपलेले आहेत. असं म्हटलं जातंय की, 2003च्या कराराच्या पहिल्यांदाच या क्षेत्रात पाकिस्तानसाठी मोर्टर्स वापरले जात आहेत. पाकिस्तानाच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी  भारतीय सैनिक देखील सतत गोळीबार करत आहेत.

Loading...

हेही वाचा

काश्मीरमध्ये चकमकीत मेजरसह 4 जवान शहीद, 4 दहशतवादी ठार

अमित शहांचा 'मातोश्री'वर फोन, मराठा आंदोलनावर केली चर्चा

उपाशी ठेऊन जीव गेला नाही, जन्मदात्यांनीच मुलीचा घोटला गळा

मराठा आरक्षणाबाबत मागास आयोगाचा अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत सरकारकडे !

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2018 04:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...