Elec-widget

पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर शोपियानमध्ये पोलीस ठाण्यावर गोळीबार

पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर शोपियानमध्ये पोलीस ठाण्यावर गोळीबार

शोपियानमधल्या किगाम पोलीस ठाण्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. दहशतवाद्यांकडून पोलीस ठाण्यावर गोळीबार करण्यात आला आहे.

  • Share this:

जम्मू काश्मीर, 14 फेब्रुवारी : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाल्यनंतरच काश्मारच्या शोपियानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला झाला आहे. काश्मीरमध्ये दिवसभरात दुसरा दहशतवादी हल्ला आहे.

शोपियानमधल्या किगाम पोलीस ठाण्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. दहशतवाद्यांकडून पोलीस ठाण्यावर गोळीबार करण्यात आला आहे. हल्ला होताच पोलिसांनी गोळीबाराचा सडेतोड प्रत्युत्तर दिलं त्यानंतर परिसरातून दहशतवाद्यांनी पळ काढला.

गुरुवारी दुपारच्या सुमारास झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे तब्बल 42 जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर दहशतवाद्यांनी शोपियानमध्ये आणखी एक हल्ला केला. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

तब्बल 2500 CRPF जवान होते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर...!

पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा आत्मघातकी हल्ला, 42 जवान शहीद

Loading...

दहशतवाद्यांनी अचानक हा आत्मघातकी हल्ला केला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची टीम गाडीतून जात होती, त्या वेळी हा हल्ला करण्यात आला. त्यानंतर गोळीबारही झाला, अशी माहिती जम्मू काश्मीरचे DGP दिलबाग सिंग यांच्याकडून देण्यात आली आहे.

या वर्षांतला हा मोठा हल्ला मानला जात आहे. न्यूज 18 सीआरपीएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात 42 जवान शहीद झाले आहेत. तर 45 जखमी झालेत. जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

हल्ल्यासाठी आयईडी बाँब पेरले होते. जैश बरोबर हिज्बुल मुजाहिदीनचीही या हल्ल्यात साथ असण्याची शक्यता असल्याचं सूत्रांकडून समजतं. जवानांची गाडी जात होती, त्या ठिकाणी आयईडी बाँब पेरला होता. हा बाँब कधी पेरला, कुणी पेरला हे अजून अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

मोदींंनी केला निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून या हल्ल्याचा निषेध केला आहे. संपूर्ण देश शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहे, असं मोदींनी म्हटलं आहे.

अजित डोवल यांनी बोलावली तातडीची बैठक

दरम्यान, राजनाथ सिंह तातडीने श्रीनगरला रवाना होणार असल्याचं वृत्त आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.


 Pulwama Attack स्फोटात बसचे तुकडे झाले, अंगावर शहारे आणणारा VIDEO


 


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2019 10:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...